जामनेर (जळगाव) : कोरोनाच्या काळात शाळा बंद (Coronavirus school closed) पण ऑनलाईन शिक्षण सुरू अशा स्थितीत ऑनलाईन शिक्षण (Online education) घेत हायटेक बनलेल्या विद्यार्थ्यांना चक्क बाराखडी, पाढे आणि उजळनीचा विसर पडला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भावितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी मागील वर्षी कोणत्या वर्गात होते, या प्रश्नाचे उत्तर देताना बहुतांश विद्यार्थी व त्यांचे पालक अडखळतात. तसेच शाळेतील शिक्षकांची नावे देखील विद्यार्थी विसरल्याचे चित्रही पहायला मिळत आहे. (jalgaon-coronavirus-impact-school-closed-student-online-education)
मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा- कॉलेज बंद आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा (State education department) घाट घातला. मात्र ह्या प्रयोगातून शिक्षण म्हणावे तसे प्रभावी ठरलेले दिसत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल हातात पडताच मुले सोशल मिडिया (Social media) आणि गेम्सच्या नादात रंगुन जातात व जास्तीत जास्त वेळ टीव्हीवरील विविध कार्यक्रम पाहण्यातच घालवतात.
जोड शब्दांची ओळखही नाही
प्रत्यक्षात शाळेमध्ये दिले जात असलेले शिक्षण अधिक प्रभावी असल्याने दुसरीपासुनच मुलांना उजळणी- पाढे मुखोद्गत होऊ लागली होती. परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोड शब्दाचे वाचनही करणे कठीण जाऊ लागले आहे. जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तके वाटप झाली. परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पानही उघडून न पाहणाऱ्या मुलांना या वर्षी कोणते धडे अभ्यासाठी आहेत, हे सुध्दा माहीत नाही.
प्रामाणिकतेने अभ्यास थोड्यांचाच
ऑनलाईन शिक्षण केवळ २५ ते ३५ टक्के विद्यार्थी प्रामाणिकतेने करत असावेत. परंतु इतर विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने मुले तेवढीच बिनधास्त झाली. परीक्षाच नाहीत तर अभ्यास कशाला असे प्रतिउत्तर मुलेच आता पालकांना देऊ लागली आहेत. यापेक्षा ही वास्तव व भयावह म्हणजे यावर्षी जून महिन्यात इयत्ता पहिली वर्गात नवीन प्रवेश देण्यात आले. पण वर्षभर शाळाच बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळाच पहिली नाही. त्यामुळे शिक्षकांची भेट ही दुर्मिळच झाली, तसेच बाराखडीचे अक्षर ही गिरवले नाही, तरीही मुले दुसऱ्या वर्गात प्रविष्ट झाली आहेत.
विद्यार्थ्यांना सक्षम करतांना शिक्षकांची खरी कसोटी
मागील वर्षापासून शैक्षणिक सत्र हे विस्कळीत झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी अभ्यासक्रमापासून दूर गेले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या ज्ञानाच्या पातळीत मोठा फरक जाणवत आहे. परिणामी भविष्यात या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी येत्या काळात शिक्षकांनांच जास्त मेहनत घ्यावी लागेल यात शंकाच नाही.
विद्यार्थ्यांना फायदा की तोटा?
मागील वर्षापासून कोरोनामुळे इयत्ता पहिलीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेचे व शिक्षकांचे तोंडही न पाहता आरटीई कायद्याने दुसरीत उडी मारली. ना शाळा ना शिक्षक तरीही विद्यार्थी मात्र पुढच्या वर्गात गेल्याने नवीन विद्यार्थ्यांचे फायदे आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण फायद्याचे की तोट्याचे यावर विचार करण्याची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.