जळगाव : एक जूननंतर राज्यातील कोरोनाचे निर्बंध काहीही असो, मात्र जळगाव शहरासह जिल्ह्यातील दुकाने लवकरच सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलू, ते सकारात्मक निर्णय देतील, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज कँट (अखिल भारतीय ट्रेडर्स असोसिएशन)च्या पदाधिकाऱ्यांना दिले. (coronavirus jalgaon lockdown merchant meet minister gulabrao patil shop open)
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतच्या चर्चेत असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरषोत्तम टावरी, राज्य उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हा अध्यक्ष संजय शाह, संचालक सुभाष कासट, शंकर ललवाणी, राम सूर्यवंशी, संजय शहा, पुरुषोत्तम टॉवरी, दिलीप गांधी, प्रवीण पगारिया आदींना दिले.
सद्यस्थितीची वेळ किचकट
कोरोनामुळे मागील दोन महिन्यापासून महाभयंकर कठिण परिस्थितीत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेऊन शासनास सहकार्य केलेले आहे. सद्य परिस्थितीत अत्यावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरु आहे. ती वेळ खुप किचकट व त्रासदायक सिध्द होत आहे. एसटी व इतर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने ग्राहकांना सकाळी सातला शहरात पोहोचणे खुप कठीण होत आहे. अशात ग्राहकी सुरु होत नाही तोवर दुकाने बंद करण्याची वेळ होते, बंद करता करता काही ग्राहकांना मोजलेला माल देता देता पाच दहा मिनिटे उशीर होतो. त्याचेवळी पोलीस येऊन फोटो घेतात व नाहक दंड भरावा लागतो.
नियमांचे पालन करून वेळ वाढवा
वेळेत बदल करुन सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत करावी. आता परिस्थिती खुप आटोक्यात आली आसल्याने नियमाचे पालन करुन सदर वेळेत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी व्यापारी बांधवांना दुकानाची वेळ वाढविण्यापेक्षा एक दोन दिवसात मुख्यमंत्री निर्बंध हटविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. असे असले तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुकानांवरील निर्बंध काही प्रमाणात हटवून व्यापार सुरू कऱण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी करेन असे आश्वासन दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.