जळगाव : कोरोना महामारीवर (Coronavirus) आळा घालण्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाने आज दूपारी अकरानंतर कडक लॉकडाऊनची (Jalgaon lockdown) घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. अंमलबजावणीसाठी खद्द अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंतासह पोलिस निरीक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर कारवाई करताना दिसून आले. दूपारी एकनंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. काही जण मात्र पोलिसांची नजर चूकवून फिरताना दिसून आलेच. (jalgaon news coronavirus jalgaon lockdown police on road)
शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधीत ॲक्टीव्ह रूणांची संख्या दहा हजारांच्या घरात आहे. त्यात चाचण्यांमध्ये सहाशे ते साडेसहाशे रुग्ण आढळून येत आहे. शासनाने १ जूनपर्यंत निर्बंध लावले असले तरी जिल्ह्यात या निर्बंधाचे कडक पालन होत नसल्याने रुग्ण संख्येत घट होत नव्हती. इतर जिल्ह्यात मात्र घट होत असताना जळगाव जिल्हयाच मागे का ? असा प्रश्न जिल्हा व पोलिस प्रशासनाला होता. यामुळे दोन्ही विभागांच्या प्रमुखांनी आजपासून १ जूनपर्यंत सकाळी ७ ते ११ वेळेनंतर कडक लॉकडाऊन राबविण्याचा निर्णय घेतला. अकरा वाजेपूर्वीच पोलिसांची व्हॅन बाजारात फिरवून अकराला दुकाने बंद करण्याच्या अन्यथा दंडाच्या कारवाईला सामोरे जा अशा सूचना देण्यात आला. यामुळे अकराला सर्वच दुकाने (मेडीकल, दवाखाने वगळता) बंद करण्यात आले.
बळीरामपेठ, सुभाष चौकात अधिकारी
पोलिसांची पथके विविध ठिकाणी तैनात करून विनाकारण फिरणाऱ्यांना हटकत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी बळीरामपेठ चौक, सुभाष चौकात स्वतः उभे राहून जाणारे येणाऱ्या वाहनधारकांची, नागरिकांची, रिक्षा चालकांची चौकशी करूनच वाहने सोडली. शहरातील विविध भागातही पोलिसांचा बंदोबस्त होता. तेही वाहनधारकांना थांबवून लायसनची विचारणा करून बाहेर का फिरताहेत ?याची चौकशी करीत होते. विनाकारण फिरणाऱ्यांना दंडूक्याचा प्रसादही खावा लागला होता. चित्रा चौक, राजकमल चौक, अजिंठा चौफुली, गणेश कॉलनी, प्रभात कॉलनी, उपनगरात मात्र पोलिस नसल्याने नागरिकांची ये-जा सुरूच होती. मात्र गावात आल्यानंतर त्यांना पोलिस पाहून माघारी फिरावे लागले होते.
दुपारनंतर तुरळक नागरिक
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने दुपारनंतर केवळ मेडीकल, रु्णालय कामासाठी नागरिक बाहेर पडल्याचे दिसून आले. यामुळे रस्ते काही अंशी ओस पडले होते. पोलिसही नंतर निवांत झाले होते.
सकाळी गर्दीचा बाजार
आजपासून अकरानंतर कडक लॉकडाऊन होणार असल्याने नागरिकांनी किराणा, दुध, फळे, भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ या परिसरात भरणारा भाजीपाला इतरत्र हलविण्यात आला आल्याने हे चौक आज रिकामे होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.