coronavirus update coronavirus update
जळगाव

जळगाव जिल्‍ह्‍यात १६ मृत्यू; नवे ८६१ रुग्ण, ८०० झाले बरे

जळगाव जिल्‍ह्‍यात १६ मृत्यू; नवे ८६१ रुग्ण, ८०० झाले बरे

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यात रोजच्या रुग्णांची संख्या कमी होत असताना ॲक्टिव रुग्णही (corona active patient) कमी होऊ लागले आहेत. आयसीयू व ऑक्सिजनवरील गंभीर रुग्णांची संख्याही आता दोन हजारांच्या खाली आली आहे. शुक्रवारी नवे ८६१ रुग्ण आढळून आले तर ८०० बरे झाले. दिवसभरात १६ जणांचा बळी गेला. (coronavirus update new positive patient retio down)

जळगाव जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. दररोजचे रुग्ण काही अंशी कमी होत असून बरे होणारे वाढत आहेत. शुक्रवारी ८ हजार ५७० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ८६१ नवे रुग्ण समोर आले असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख २८ हजार १७२ झाली आहे. तर ८०० रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १६ हजार २७४ झाला आहे.

मृत्यूही घटले

रुग्णसंख्या कमी होत असताना आता जिल्ह्यातील मृत्युचा आकडाही कमी होत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी दररोज २० पेक्षा अधिक जणांचा बळी जात होता. तीन-चार दिवसांपासून ही संख्या वीसच्या आत आली असून शुक्रवारी एका तीस वर्षीय तरुणासह १६ जणांचा मृत्यू झाला. जळगाव शहरातील ४ जणांचा समावेश आहे. एकूण बळींचा आकडा २३०४ झाला आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १२७, जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ १०६, अमळनेर ३६, चोपडा ४७, पाचोरा २८, भडगाव ७, धरणगाव १५, यावल २४, एरंडोल २४, जामनेर १०५, रावेर ७०, पारोळा ३५, चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर ८१, बोदवड ३६, अन्य जिल्ह्यातील २१.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT