फैजपूर (जळगाव) : सिंधूताई सपकाळ यांचे (Shindhutai sapkal) निराधार आश्रम सद्यःस्थितीत कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणीत आले आहे. अशा कठीण परिस्थितीत निराधार मुलांना आधार देणे आवश्यक आहे. यासाठी फैजपूर (Faizpur) शहरातून सुमारे एक लाख २१ हजारांची मदत तातडीने रवाना केल्याची माहिती ‘मसाका’चे संचालक नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी दिली. (faizpur shindhutai sapkal ashram help)
सिंधूताई सपकाळ यांनी समाजातील निराधार बालकांचे संगोपन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समीत केले आहे. सद्यःस्थितीत कोरोनामुळे माईंचे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे आर्थिक मदतीचा ओघ थांबल्यामुळे या निराधार बालसंगोपन केंद्रासाठी किराणा व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी फैजपूर शहरवासीयांनी मदतीचा हात देण्याचे ठरविले असून, तातडीने एक लाख २१ हजार रक्कम पाठवली गेली आहे. यासाठी मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनी पुढाकार घेऊन मित्रपरिवार व सहकारी संस्थांच्या मदतीने या निराधारांना आधार देण्याचे ठरविले आहे. या कार्यासाठी सातपुडा अर्बन पतसंस्था, (कै.) देवीदास टिकाराम चौधरी नागरी पतसंस्था, श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था, (कै.) दादासाहेब वसंतराव पाटील औद्योगिक संस्था यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये आर्थिक मदत यामध्ये केली असून, नरेंद्र नारखेडे, अनिल नारखेडे यांच्या परिवारासह मित्रमंडळींनी देखील ५१ हजारांची मदत केली आहे.
सिंधूताईंचे भावनिक नाते
सिंधूताई यांचे पूर्व आयुष्य फैजपूर शहरात वास्तव्य राहिले असल्यामुळे फैजपूर हे माईंनी माहेर मानले असून, भावनिक नाते जुळले आहे. या कार्यासाठी औद्योगिक वसाहत चेअरमन मनोजकुमार पाटील, प्रांताधिकारी कैलास कडलग, सातपुडा अर्बनचे व्हाइस चेअरमन चंद्रशेखर चौधरी, अंबिका दूध डेअरीचे चेअरमन हेमराज चौधरी, डॉ. पद्माकर पाटील, पांडुरंग सराफ, विलास नेमाडे, जयप्रकाश चौधरी, अनिल नारखेडे, नितीन चौधरी, भालचंद्र चौधरी, विजयकुमार परदेशी, निळकंठ सराफ, खेमचंद नेहेते, गिरीश पाटील, किरण चौधरी, पत्रकार योगेश सोनवणे यांच्यासह असंख्य मित्रपरिवाराचे सहकार्य लाभत आहे. अशीच मदत यापुढेही करावी, अशी विनंती नरेंद्र नारखेडे यांनी केली आहे. अधिक माहिती संस्थेचे स्वयंसेवक विनय सपकाळ, पुणे-९०४९४७४५४४, ८६००७६००१४ या फोनवर संपर्क साधावा. आमच्या निराधार आश्रमाला फैजपूरवासीयांकडून मिळालेली मदत म्हणजे माहेरची साडीचोळी व बांगडी होय, असे भावनोत्कट उद्गार सिंधूताई यांनी काढले.
‘सकाळ’चा लेख ठरला प्रेणादायी
‘सकाळ’मध्ये १६ मेस साहित्य-संस्कृती-कला पुरवणीमध्ये लेखक संदीप काळेलिखित भ्रमंती लाइव्ह सदरात ‘माईंची लेकरं निराधार’ प्रसिद्ध झाला होता. या लेखाची दखल घेत फैजपूरकरांनी निराधारांना फैजपुरातून सिंधूताई सपकाळ आश्रमास आर्थिक मदतीचा ओघ सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.