Dr- jayprakash ramanand Dr- jayprakash ramanand
जळगाव

उपचारासाठी पहिल्या क्रमांकाचे रुग्णालय करणार : अधिष्ठाता डॉ. रामानंद

उपचारासाठी पहिल्या क्रमांकाचे रुग्णालय करणार : अधिष्ठाता डॉ. रामानंद

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : भविष्यात आणखी लोकाभिमुख कार्य करणार आहे. प्रत्येक रुग्ण बरा होऊ शकतो, त्यासाठी योग्य उपचार, वेळेचे पालन, तत्काळ निदान आणि सकारात्मकता हवी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे (Jalgaon goverment medical collage) उपचारासाठी रुग्णांचे पहिल्या क्रमांकाचे पसंतीचे रुग्णालय व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद (Medical collage dean dr- ramanand) यांनी दिली. (jalgaon-medical-collage-dean-jayprakash-ramanand-one-year-complate)

डॉ. रामानंद यांना पदभार घेऊन आज (ता.१३) वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीनिमित्त ‘सकाळ’शी ते बोलत होते. शासकीय रुग्णालय म्हटले, की ते गरिबांचे रुग्णालय. रुग्णांच्या हालअपेष्टा.. डॉक्टर, परिचारिकांवर अंकुश नाही.. बेपर्वा कारभार.. सुरक्षा वाऱ्यावर.. सुविधांच्या नावाने कायम बोंब.. असे चित्र साधारणपणे देशात अनेक ठिकाणी दिसून येते. याला मोजकी सरकारी रुग्णालये अपवाद ठरतात. त्यातीलच एक अपवाद ठरणारे जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालय. येथे वर्षभरापूर्वी असेच अनागोंदीचे, बेपर्वा कारभाराचे वातावरण होते. हे वातावरण बदलवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. रामानंद यांनी वर्षभरात केले. मालती नेहेते (रा. भुसावळ) या कोरोनाबाधित (Coronavirus) बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह १० जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शौचालयात आढळून आला होता. या बेपर्वा कारभारामुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह पाच जण निलंबित झाले होते. मृत्युदरही वाढला होता. खमक्या अधिकाऱ्याची येथे आवश्यकता होती. यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी शासनाने कोल्हापूर येथे केलेल्या प्रशंसनीय कामगिरीमुळे नवीन अधिष्ठाता म्हणून डॉ. रामानंद यांची नियुक्ती केली. त्यांनी १३ जून २०२० ला पदभार घेतला.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची बांधली मोट

डॉ. रामानंद यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक, इतर कर्मचारी यांची मोट बांधून त्यांच्या कामकाजात सुसूत्रता आणली. रुग्णालयाच्या आवारात सुरक्षाव्यवस्था कडक ठेवली. रुग्णालयाचे गंभीर झालेले चित्र डॉ. रामानंद यांनी बदलले. ‘थ्री एम’ अर्थात, मनी, मटेरियल, मॅन म्हणजेच मनुष्यबळ, सुविधा आणि उपलब्ध निधी यानुसार सातत्याने आढावा घेत नियोजनबद्धपणे काम केले. रुग्णालयातून नवजात बालकांसह लहान बालके आणि वयोवृद्ध रुग्णही कोरोनामुक्त होऊन घरी परतले. अनेक कोरोनाबाधित महिलांची गुंतागुतीची असलेली सुखरूप प्रसूती त्यांच्या काळात झाली. रुग्णांसह नातेवाइकांत विश्वास निर्माण झाला आहे. राज्यात बेड साइड असिस्टंट पहिलाच प्रयोग राबविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT