जळगाव : इस्त्री केलेल्या कपड्यांचे पैसे मागितल्याच्या रागातून पोलीस (Jalgaon police) मुख्यालयात कार्यरत पोलिसाने विवाहितेसह तिच्या पती व भाच्याला पिस्तुलने (Shoot Gan) उडविण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. पोलिसांकडूनच जन सामान्यांवर अन्याय होत असल्याचे पुन्हा यावरुन समोर आले आहे. (jalgaon news jalgaon police threaten to shoot with a pistol if ironed)
औद्योगिक वसाहत परीसराला लागूनच कौतिकनगरात राधा विजय वाघ या कुटूंबासह वास्तव्यास असून ते इस्त्रीचा व्यवसाय करतात. पती- पत्नी व भाचा असे घरगुती दुकानावर लोकांचे कपडे इस्त्री करुन येणाऱ्या उत्पन्नात कुटूंबीयांची गुजराण सुरु आहे. परिसरातच सद्गुरूनगरातील रहिवासी आणि पोलिस मुख्यालयात कार्यरत नटवर जाधव नावाचे पोलिस कर्मचारी यांनी वाघ यांच्या दुकानावर कपडे इस्त्रीसाठी पाठवले होते.
उधारी मागितली अन्
रविवार नटवर जाधव कपडे घेण्यासाठी आले. मात्र राधा वाघ यांनी कपड्यांना इस्त्री केलेली नव्हती. यापुर्वी बाकी असलेली उधारीचे पैसे द्यावे; नंतर पुढचे काम करतो, असे सांगितल्याचा राग आल्याने नटवर जाधवने राधा व त्यांचे पती विजय यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी भाचा विक्की बेडीस्करमध्ये आला. तर त्याला व विजय वाघ यांना बेदम मारहाण करुन पिस्तुलीने उडवुन देण्याची धमकी दिल्याचे राधा वाघ यांनी दिलेल्या तक्रारी वरुन नटवर जाधव याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आमोल मोरे तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.