bhusawal memu train bhusawal memu train
जळगाव

भुसावळ- पुणेदरम्यान धावणार मेमू ट्रेन; प्रवाशांची होणार सोय

जळगाव, चाळीसगाव, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

राजेश सोनवणे

भुसावळ (जळगाव) : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी १५ व २९ एप्रिल रोजी केवळ दोन दिवस भुसावळ ते पुणे व पुणे ते भुसावळ मेमू ट्रेन चालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तूर्त पंधरवड्यात चार फेऱ्या मेमू चालवण्यात येणार आहे.

अप ०११३५ भुसावळ- पुणे विशेष एक्सप्रेस गुरुवार १५ एप्रिल व २९ एप्रिलला भुसावळ स्थानकावरून पहाटे ६.१५ वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ४.४५ वाजता पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीला अप दिशेला जळगाव, चाळीसगाव, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. परतीच्या प्रवासात डाऊन ११३६ पुणे- भुसावळ विशेष एक्स्प्रेस शुक्रवार १६ एप्रिल व ३० एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.४५ भुसावळला पोहोचेल. डाउन दिशेला मनमाड, चाळीसगाव व जळगाव स्थानकावर तसेच उरूली, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला आठ आरक्षित सिटिंग कोच असतील. १४ पासून या गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे.

मुंबई-पुण्यासाठी विशेष गाड्या

मुंबई-हटिया व पुणे-दानापूर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ०११२७ विशेष द्वि-साप्ताहिक गाडी १३ ते ३० एप्रिलदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवार आणि शुक्रवारी ११.०५ वाजता सुटेल आणि हटिया येथे तिसर्‍या दिवशी ३.४५ वाजता पोहोचणार आहे. ०११२८ द्वि-साप्ताहिक विशेष गाडी १५ ते २ मे दरम्यान पर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी हटिया येथून ८.४० सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १.३० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ जंक्शन, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, पाच शयनयान, १४ द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे-दानापूर विशेष गाडी ०१४३९ अतिजलद विशेष गाडी १३ व २० एप्रिल व २७ एप्रिल रोजी पुणे येथून ६.१० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्‍या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. ०१४४० विशेष गाडी १४ व २१ व २८ एप्रिल दानापूर येथून १३.४० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍य दिवशी ११.१० वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाईन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी आणि पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, नऊ शयनयान, नऊ द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. केवळ कंन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT