pachoro shiv sena sakal
जळगाव

महावितरण कार्यालयास ठोकले कुलूप; शिवसेनेचे आंदोलन

महावितरण कार्यालयास ठोकले कुलूप; शिवसेनेचे आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

पाचोरा (जळगाव) : शिवसेनेच्यावतीने आमदार किशोर पाटील (Shiv sena mla kishor patil) यांच्या उपस्थितीत महावितरणच्या मुख्य कार्यालयास (Mahavitaran door lock) ताला ठोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनानंतर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्यासह ४५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करून त्यांची सुटका करण्यात आली. (pachora-shiv-sena-strike-in-farmer-issue-mahavitaran-door-lock)

‘महावितरण’च्यावतीने कृषिपंपांच्या वीज बिलाची सक्तीने (Farmer agriculture pump light bill) वसुली केली जात आहे. तसेच वीज बिल वसुलीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे व आदेशाचे पालन न करता आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक करून अन्याय केला जात आहे. याबाबत आमदार किशोर पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. गेल्या आठवड्यात आमदार पाटील यांनी महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मनमानी वसुली थांबवावी. शेतकऱ्यांची परिस्थिती विचारात घेण्यात यावा व अन्याय थांबवावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता.

आज प्रत्‍यक्ष आंदोलन

त्याबाबत महावितरणकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात न आल्याने आमदार किशोर पाटील यांनी सोमवार (ता. ७) गिरड रस्त्यावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयास कुलूप ठोकून आंदोलन केले. आमदारांनी अगोदरच आंदोलनाचा इशारा दिल्याने कार्यकारी अभियंत्यांच्या दालन अगोदरपासूनच बंद करण्यात आले होते. त्याच कुलपावर आमदार किशोर पाटील यांनी कुलूप व बॅनर लावून आंदोलन केले. याप्रसंगी छत्रपती शिवराय व माँसाहेब जिजाऊंचा जयघोष करत महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात व मनमानी संदर्भात घोषणाबाजी करण्यात आली.

तर यापुढे दणके द्या आंदोलन

शेतकऱ्यांवरील अन्याय न थांबवल्यास कोणत्याही प्रकारचा इशारा न देता जळगाव येथील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयातून ओढत बाहेर काढून दणके द्या आंदोलन करू; असा इशारा आमदारांनी यावेळी दिला. कृषिपंपांचा नादुरुस्त झालेला ट्रांसफार्मर ४८ तासांच्या आत बदलून न मिळाल्यास महावितरणने प्रति तास ५० रुपये दंड द्यावा; असा नियम असताना दोन- दोन महिने ट्रान्सफार्मर बदलून दिला जात नाही. कृषिपंपांना मीटरच नाही तर मग रिडींग कसे घेता? शासनाच्या आदेशाच्या विरोधात भूमिका घेण्याची महावितरणची हिम्मत कशी होते? आता महावितरणला माफी नाही. 'ये तो झाकी है बडा प्रोग्राम अभी बाकी है' असा सज्जड इशारा आमदारानी यावेळी दिला. याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, शहर प्रमुख किशोर बारावकर, गणेश पाटील, चंद्रकांत धनवडे, संदीपराजे पाटील, जितेंद्र पेंढारकर, दत्तात्रय जडे, सुमित सावंत, नगरसेवक राम केसवानी, बापू हटकर, रहमान तडवी, शितल सोमवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यालयाबाहेर सकाळपासूनच बंदोबस्‍त

आंदोलनातचे गांभीर्य ओळखून महावितरण कार्यालयाला प्रचंड बंदोबस्तामुळे जणू काही छावणीचे स्वरूप आले. पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, उपनिरीक्षक गणेश चौभे, विकास पाटील, विजया वसावे, शुभांगी पाटील यांचेसह पाचोरा, जामनेर, पहूर येथील सुमारे ७५ अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. या आंदोलनानंतर आमदार किशोर पाटील यांचे सह शिवसेनेच्या सुमारे ४५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात आणून अटकेची कारवाई करून लगेचच सुटका करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT