कळमसरे (ता. अमळनेर) : दरवर्षी अक्षय तृतीयाला (Akshay tritiya) सालदार गडीची नवीन सालदारकिला सुरवात होते. सद्यस्थितीत शेतमालक वर्षभरासाठी सालदार गडी शोधण्याच्या प्रयत्नात असून दिवसेंदिवस सालदार मिळवण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करावे लागत आहे. दरवर्षी सालदारांचे दर वाढवूनही सालदार मिळत नसल्याने शेत (Farmer) मालक हवालदील झालेला आहे. (Saldar gadi was not available even after increasing the year)
दरवर्षी बियाणे, रासायनिक खते, फवारणी औषधे महाग होत असल्याने शेती करणेही अवघड झाले आहे. मात्र पारंपारिक वडिलोपार्जीत शेती व्यवसाय असल्याने ती परंपरा सुरु आहे. त्यातच शेती कसण्यासाठी कळमसरे परिसरात सालदार गडीची शोधा शोध सुरु आहे. सद्यस्थितीत मजूरी करणाऱ्या तरुणांची एकाच ठिकाणी काम करण्याची मानसिकता न राहिल्याने सालदारकीकडे पाठ फिरविली आहे. परिणामी सालदार मिळने जिकीरीचे झाल्याने शेतमालक शेतात काम करण्यासाठी गडी हवा म्हणून मध्यप्रदेशातील पावरा समाजाचे मजुराना शेतातच मुक्कामी ठेवत त्याच्या राहण्याची सुविधा करुंन देण्यापर्यंत प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन सालदाराबरोबर त्याचे कुटुंब ही शेतात राबण्यास उपलब्ध होतील म्हणून शेतमालकांचे प्रयत्न आहेत.
निम्म्या हिश्यात शेती कसण्यावर भर
दरवर्षी खर्च जास्त आणि उत्पन्न कमी याला कंटाळून बऱ्याच शेतमालकानी नेहमी आपल्याकडे राबणाऱ्या मजुरांनाच निम्मे वाट्याने शेती कसण्यासाठी देत आहेत. यामुळे शेतमालकाची शेती व मजुराची मेहनत यातून येणाऱ्या उत्पन्नात निम्मे वाट्याने वर्षभरासाठी शेती दिली जाते. शेत मालकाने पसंद केले आहे. तर काही शेतकरी सरळ वर्षभरासाठी रोख रक्कम (मोबदला) घेऊन शेतीतले उत्पन्न कसणाऱ्याने घ्यावे असेही चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे मजुरवर्ग ही स्वतः शेती करतांना पहावयास मिळत आहे.
तरुणांची शहराकडे धाव
वर्षभर उन्हातान्हात राबराब राबण्यापेक्षा शहरात काम करणे तरुणांनी पसंतीचे केल्यामुळे सद्यस्थितीत गुजरात येथील सूरत, वापी, अहमदाबाद, नवसारी, महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी शहरात तरुणांनी कंपनीत कामास पसंती दिली आहे. दिवसेंदिवस प्रत्येकाचा दृश्टिकोन बदलत चालल्याने शेती व्यवसायाला महागाई व मजूर तूटवडा आदी कारणे परिणामकारक ठरत आहेत.
९० हजाराचे फुटले साल तरीही येईनात
सद्यस्थितित कळमसरे येथे एका वर्षभरासाठी ९० हजार साल व चार पोते धान्य एवढा भाव जाहीर झाला आहे. मात्र वाढत्या महागाईने शेतमालकाबरोबरच सालदार गडीलाही त्याचा सामना करावा लागत असल्याने सालदार ही पद्धतच नामशेष होण्याचा मार्गावर आहे की काय?असाही प्रश्न वयोरुद्ध शेतकाऱ्यांसह मजुरांना व्हावयास लागली आहे.
बागायती शेती क्षेत्र नसल्याने उत्पन्नची हमी नाही
कळमसरेसह परिसरात शहापुर, निम, तांदळी, वासरे, खेडी, खरदे, पाडळसे, मारवड, गोवर्धन, बोहरा, डांगरी आदी गाव परिसरात कुठेच बारमाही बागायत क्षेत्र व सिंचनाची सोय नसल्याने उत्पादनाची हमी नसल्याने सद्यस्थितित शेती व्यवसाय ही सट्टा जुगार सारखा प्रकार झाला असल्याचे बोलले जात आहे. हजारो रूपयांचे भांडवल टाकून उतपन्न येईल यांची शास्वती नसल्याने शेती कसण्यासाठी कुणीही पुढे यायला तयार नसल्याचे चित्र आहे. याच परिसरातून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा कामानिमित्त शहराकडे आकर्षित झाला आहे. सालदारकीत दररोज सकाळ ते संध्याकाळी शेतमालकाकडे गुराढोरांचा चारा- पाणी करण्यापेक्षा शहरात काम करणे पसंती केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.