corona death 
जळगाव

सुन्‍न करणारी घटना..एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्‍यू तेही एका पाठोपाठ चार दिवसातच

प्रवीण पाटील

सावदा (जळगाव) : जिल्ह्यासह रावेर तालुक्यात कोरोनाचा संक्रमण वाढत असून, सावदा येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी गेला आहे. तर घरातील सुनेच्या मृत्यूचा व मुलांच्या आजाराचा धसका घेतल्याने वृद्ध आईचाही मृत्यू झाला आहे. मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 
येथील (स्व.) गणपतसिंह परदेशी यांचे पाच मुलांचे मोठे कुटुंब व संख्येने मोठा परिवार आहे. पाच- सहा वर्षांपूर्वी या कुटुंबातील दोन ज्येष्ठ बंधू रणजितसिंह व सतीशसिंह परदेशी व एका बहिणीचा आजाराने मृत्यू झाला आहे. त्यातून हा परिवार सावरत नाही तोच या कुटुंबाला पुन्हा या वर्षी कोरोना विषाणूने पछाडले आणि चार दिवसांत एकामागून एक मृत्यू ओढवले. 

सुनेचा मृत्‍यू अन्‌ मुलाला कोरोनाचा आईला धसका
आधी घरातील संगीता किशोरसिंह परदेशी (वय ४०) यांचा रविवारी (ता. २१), तर सोमवारी (ता. २२) वृद्ध आई कुंवरबाई गणपतसिंह परदेशी (८५) यांचे निधन झाले. त्यानंतर मुलगा किशोरसिंह परदेशी (५४) यांचा बुधवारी (ता. २४) मृत्यू झाला. नियतीचा हा खेळ एवढ्यावरच न थांबता गुरुवारी (ता. २५) पुन्हा याच कुटुंबातील कैलाससिंह परदेशी (५६) यांचा कोविड सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

आई- वडील गेल्‍या झाले पोरके
परदेशी कुटुंबातील सुनेपाठोपाठ वृद्ध आई, दोन मुले अशा एकूण चार जणांचा बळी गेला. किशोर व संगीता या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुली व एक मुलगा या तिघांच्या डोक्यावरील मातृ, पितृछत्र हरपले आहे. परदेशी कुटुंब शिवसेनेशी निगडित आहे. राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या या कुटुंबातील मृतांपैकी एक जण ‘एलआयसी’चे विकास अधिकारी, तर एकजण पत्रकार असल्याने या कुटुंबाचा सामाजिक कार्य व व्यवसायामुळे समाजातील सर्वच क्षेत्रात संपर्क व संबंध आहे. त्यामुळे कुटुंबावर कोसळलेल्या या पहाडाएवढ्या दुःखाने समाजमनही सुन्न झाले आहे. विविध क्षेत्रांतील अनेकांनी परदेशी कुटुंबीयांना भेटून व फोन करून या दुःखातून त्यांना सावरता यावे, यासाठी धीर दिला. 
 
स्थानिक प्रशासन अनभिज्ञ 
परदेशी कुटुंबातील कैलास परदेशी यांचा कोरोना अहवाल बाधित होता. मृत किशोर परदेशी व संगीता परदेशी जळगाव येथे खासगी कोरोना रुग्णालयात उपचार घेत होते. पण त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याबाबत स्थानिक प्रशासनाला कोणतीही अधिकृत सूचना नाही, असे पालिकेचे अधिकारी संदीप पाटील यांनी सांगितले. तर कोरोनाला प्रतिबंध बसावा, यासाठी जनतेने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, काही त्रास जाणवल्यास लागलीच तपासणी करून घ्यावी, असे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी आवाहन केले. 

दुसऱ्या टप्प्यात प्रभाव वाढला 
सावदा येथे गेल्या वर्षी २२४ कोरोना बाधित होते. तर, एकूण सात जणांना जीव गमवावा लागला होता. या वर्षी पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दुसऱ्या टप्प्यात सरकारी आकड्यानुसार या वर्षी एक मृत्यू झाला आहे. या वर्षी ४७ कोरोनाबाधित आहेत. 

संपादन - राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT