jalgaon shiv sena sakal
जळगाव

पुनर्रचनेच्या नावाने शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण

पुनर्रचनेच्या नावाने शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण

सचिन जोशी

जळगाव : पक्षबांधणी, संघटनात्मक पुनर्रचनेच्या नावाने शिवसेनेने (Jalgaon shiv sena) जिल्ह्यात केलेल्या नियुक्त्यांवर नाराजीचा सूर उमटत आहे. ही पुनर्रचना केवळ पक्षांतर्गत शह- काटशहाचे राजकारण असल्याने संघटनेतील खदखद वाढली आहे. दुसरीकडे ‘मातोश्री’चा आदेश अंतिम असतो हे सांगायला संजय राऊत (Sanjay Raut) येत असले तरी प्रामाणिक कार्यकर्त्यांप्रति मातोश्रीची माया आटल्याची चर्चाही या सैनिकांमध्ये सुरू आहे. (jalgaon-political-news-shiv-sena-restructuring-raver-and-jalgaon-loksabha-aria)

खरेतर पक्ष असो की संघटना ती चांगली चालवायची असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या (NCP Leader sharad pawar) भाषेत ‘भाकरी फिरवणे’ गरजेचे असते. पवारांचा हा फॉर्म्युला अनेक पक्षांनी स्वीकारला व अमलातही आणला. अर्थात, भाकरी करपणे टाळण्यासाठी म्हणून ती फिरवायला हरकत नाही. पण, करपण्याआधीच फिरवली तर ती मोडते, कच्ची राहते... आणि पक्षसंघटनेत असा प्रकार झाला तर ती विस्कटते..

मराठवाड्याच्‍या धर्तीवर नियुक्‍ती

शिवसेनेत गेल्या आठवड्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनी नेमके तेच झाले. मराठवाड्यातील रचनेच्या धर्तीवर लोकसभा क्षेत्रनिहाय प्रमुखांची नियुक्ती जळगाव जिल्ह्यातही करण्यात आली. पक्षसंघटन बळकट करण्यासाठी तीन विधानसभा क्षेत्रे मिळून एक प्रमुख अशी ही रचना असल्याचे सांगण्यात आले.

ती बढती की शह

गुलाबराव वाघ व मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील शिवसेनेचे लोकसभा क्षेत्रनिहाय दोन जिल्हाप्रमुख होते. आता या दोन्ही क्षेत्रांत तीन-तीन जणांकडे ही पदे आली. त्यात चंद्रकांत पाटील रावेर लोकसभा क्षेत्रात कायम राहिले, तर जळगाव क्षेत्रात गुलाबराव वाघांना सहसंपर्कप्रमुख म्हणून बढती दिली. आता ही बढती आहे की जिल्ह्यातील प्रभाव कमी करण्यासाठी दिलेला शह हे ज्याचे त्याने समजून घ्यायचे राजकारण.

डॉ. माने अन्‌ भंगाळेंच्‍या नियुक्‍तीचा चेकमेट

जळगाव क्षेत्रातील अन्य दोन नियुक्त्यांत पारोळ्यातून डॉ. हर्षल माने व जळगाव शहरासह ग्रामीणसाठी विष्णू भंगाळे यांचा समावेश आहे. डॉ. मानेंचा विचार केला तर पालकमंत्री गुलाबराव पाटलांना (त्यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार) पक्षांतर्गत त्रास सहन करावा लागला त्या पारोळ्यातील ही नियुक्ती चिमणआबांसाठी खटकणारी ठरलीय. तिकडे पाचोऱ्यात आप्पांसाठीही हा विषय अचडणीचा असू शकतो.

जळगाव शहरात विष्णू भंगाळेंना दिलेली जबाबदारी त्यांच्या पक्षांतर्गत कामाची पावती कशी असू शकेल? कारण शिवसेनेसाठी भंगाळेंनी काय केले, हा प्रश्‍न सामान्य शिवसैनिकांना पडत असेल तर त्यात वावगे नाही. त्यामुळे जळगाव मनपात भाजपच्या नगरसेवकांना शिवसेनेत दाखल करताना जिल्ह्यातील नेतृत्व व या नेतृत्वावर हात असलेल्या प्रमुखांना बायपास करत असेल तर विरोधी पक्षनेत्यावर वचक असावा म्हणून भंगाळेंच्या नियुक्तीचा ‘चेकमेट’ दिल्याचा समज होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.

पक्षात खदखद वाढलीय

तिकडे रावेर लोकसभा क्षेत्रात माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंसह भुसावळचे संजय महाजन व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. या भागात मुक्ताईनगर, चोपडा व भुसावळ वगळता शिवसेनेचे अस्तित्व शोधावे लागते. त्यामुळे या क्षेत्रात राजकारण असले तरी शह-काटशह नाही, असे प्रथमदर्शनी तरी दिसते.

पुनर्रचनेच्या नावाखाली केलेल्या या नियुक्त्या संघटन बांधणीच्या दृष्टीने केल्याचा दावा केला जात असला तरी त्यातून खदखद वाढलीय. पक्षप्रमुखांनंतर संघटना बघणारे संजय राऊत व संपर्क ठेवणारे प्रमुख म्हणून संजय सावंत चार दिवसांत जिल्ह्यात येताहेत. या नियुक्त्या ‘मातोश्रीचे फर्मान’ असल्याचा पुनरुच्चार ते करतील, पण त्यामुळे मूळ शिवसैनिक अधिक दुरावणार तर नाही ना हेदेखील त्यांना बघावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT