Amalner Indian Flag 
जळगाव

अमळनेरमध्ये १०५ फुटांवर फडकला "तिरंगा"

Independence day News : रिमोट कंट्रोलच्या मदतीने स्तंभावर ३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम


अमळनेर : शहरात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित (75th Independence day) तिरंगा चौकाचे उदघाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या हस्ते तर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने 105 फूट स्तंभाचे (Indian Flag) ध्वजारोहण करण्यात आले.

Amalner Indian Flag


यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील,माजी आमदार स्मिता वाघ,उपनगराध्यक्ष विनोद लंबोळे, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक,मार्केट च्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील,तहसीलदार मिलिंद वाघ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांची प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.

Amalner Indian Flag

पन्नास किलो वजनाचा ध्वज
रिमोट कंट्रोलच्या मदतीने स्तंभावर ३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला. यावेळी.अनेकांनी या राष्ट्रीय सोहळ्याचा आनंद घेतला. दिवसभर अबालवृद्धांची तिरंग्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती. शहराबाहेर तीन चार किमी अंतरावरून तिरंगा दिमाखात फडकतांना दिसून येतो. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून हा बहुचर्चित उपक्रम रखडलेला होता.

Amalner Indian Flag

नगरपालिका क्षेत्रात अभिनव प्रयोग
अमळनेर नगरपालिकेने राष्ट्रहिताचा उपक्रम राबविल्याने नागरिकांकडून त्याचे स्वागत करण्यात आले आहे. नगर पालिकेच्या सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी एकमताने या ठरावाला संमती दिल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी सांगितले. १०५ फुटांच्यावर तिरंगा ध्वज उभारण्याचा बहुमान उत्तर महाराष्ट्रातील अमळनेर नगरपालिकेला प्राप्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT