जळगाव

कोरोनाने पती गमाविलेल्या "ती"च्या जिद्दीला सलाम..!

कोरोनाची दुसरी लाट आली त्यात होत्याचे नव्हते झाले.

उमेश काटे

अमळनेर : ग्रामीण (Rural) भागातील स्त्री ही दुबळी असते तिला जगाचं फारसं कळतं नाही, "चूल आणि मूल" यालाचं ती आपलं आयुष्य मानते. पण; ग्रामीण स्त्री ही भावनिक असल्याने समाजाने तिला विनाकारण हा शिक्का लावून ठेवला आहे. मात्र; पुरुषांना मागे टाकत स्त्रिया आज संकटावर मात करून कणखरपणे उभ्या राहताना दिसत आहेत. पतीचं कोरोनामुळे (corona) निधन (death) झाल्यानंतर दीड महिन्यातच आपले सारे दुःख बाजूला सारत तिने पदर खोचला अन चक्क ती पिठगिरणी चालक बनली. या जिद्दी स्त्रीची कहाणी आहे मंगरूळ (ता अमळनेर) येथील साधना सुनील पाटील यांची.

(husbands death due to corona wife continued business)

श्रीमती पाटील यांचे पती सुनील पाटील ( वय ५०) हे कोरोना पॉझिटिव्ह (positive)आल्याने पंधरा दिवसाच्या जीवन मृत्यूचा संघर्ष करत अखेर १५ एप्रिल २०२१ रोजी जळगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झालं आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी साधनाताई ना वैधव्य आलं. दोन मुली, एक मुलगा सोबतच आमचे वृद्ध सासू सासरे घरी आहेत. पतीचे निधन झाल्यानंतर आपसूकच गावी या सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेती व त्याला जोडव्यवसाय म्हणून त्यांच्या सासऱ्यांनी १९७६ साली गावात पिठाची गिरणी सुरू केली होती. बरेच वर्षे सासऱ्यांनी पिठगिरणी चालवली. त्यात त्यानी कुटुंबातील सदस्यांचे संगोपन, शिक्षण, सोबतच कौटुंबिक उदरनिर्वाह त्यांनी चालवत आणला. कालांतराने त्यांचे पती सुनील पाटील यांनी पिठगिरणीचा व्यवसाय सांभाळला. त्यानी पण तब्बल २५ वर्षे पिठाची गिरणी सांभाळली. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली. त्यात होत्याचे नव्हते झाले. अन १५ एप्रिलला पतीचे निधन झाले.

आता पुढं कसं होणार?

पर्यायाने गेली २५ वर्षे सांभाळत असलेल्या पिठाच्या गिरणीची चाके थांबली होती, वृद्ध सासरे हे पण कोरोनातून कसेबसे बाहेर आले. ते थकले असल्याने त्यांच्याकडून आता पिठगिरणी चालविण्याचे काम होत नाही. यामुळे आता सर्वांसमोर प्रश्न पडला की आता पुढं कसं होणार? शेती बिन भरवश्याची झाली आहे. घरात एकही जण सरकारी नोकरीत नाही. मग कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा ? पिठगिरणी बंद करायची की भाड्याने चालवायला द्यायची की कोण चालवणार नाही म्हणून विकून टाकायची ? कुटुंब सांभाळणारा व्यक्तीच गेल्याने यापुढील सर्वोतोपरी मदत करणं हे आपले कर्तव्य आहे, हे साधनाताई ओळखले. वृद्ध सासू सासरे आणि तीन मुलांचा संसार सांभाळणे साधनाताई कठीण जाणार होते.

वयाच्या पन्नाशीत पतीचं निधन झाल्याने त्या खचल्या होत्या. घर कसं चालणार ? याची तिला विवंचना होती. पती अचानक सोडून गेल्याचं अपार दुःखही तिला सोसवेना. पतीच्या जाण्याची पोकळी मुळीच भरणारी नाही. पण; या दुःखातून तिला सावरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पती चालवत असलेली पिठगिरणी सुरू करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. दीर विकास भदाणे यांनीही त्यांना उमेद दिली. त्या गेल्या पंधरा दिवसांपासून गावात पिठगिरणी चालवत आहे. दुःख पचवणं कठीण आहे परंतु; त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग त्यानी स्वतःच शोधून काढला.

रडत न बसता पदर खोचला

कोरोनामुळे आज अनेक मुलांचे मातृपितृ छत्र हिरावले गेल्याने ही मुलं उघड्यावर आलीत कुणी अनाथ झालीत. त्यांना सांभाळायचं काम सरकार पातळीवर होईलच परंतु; सरकार देऊन-देऊन काय देणार? शेवटी आपल्या रोजी रोटीची व्यवस्था आपल्यालाचं बघावी लागेल. त्यामुळे आपल्या कुटुंबावर आलेल्या विदारक परिस्थितीवर रडत न बसता पदर खोचून अन्य महिलांनीदेखील या दुःखातून सावरत नव्या उमेदीने उभं राहायला हवं आणि आपच्या कुटुंबाचा गाडा पूर्ववत करण्याशिवाय दुसरा पर्याय तरी काय ? असा मौलिक सल्ला ही साधनाताई देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT