Vaccination Vaccination
जळगाव

भुसावळला दररोज होणार तीन हजार जणांचे लसीकरण

तिसऱ्या लाटेतील लहान मुलांमधील आजाराचे प्रमाण आपण निश्‍चित कमी करू शकतो

चेतन चौधरी


भुसावळ : शहरातील द. शि. विद्यालयात नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. या केंद्रात (center) दररोज दोन हजार नागरिकांचे लसीकरण ( Corona Vaccination) करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि द. शि. विद्यालय केंद्र मिळून तीन हजार नागरिकांचे लसीकरण होणार आहे. उद्‌घाटनप्रसंगी आमदार संजय सावकारे, उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, आरोग्य सभापती दिनेश राठी उपस्थित होते.

(bhusawal city daily three thousand corona vaccination)

या वेळी आमदार सावकारे यांनी सर्व नागरिकांनी लसीकरण केल्यास तिसऱ्या लाटेतील लहान मुलांमधील आजाराचे प्रमाण आपण निश्‍चित कमी करू शकतो, असे स्पष्ट केले आणि शहरातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले. नगराध्यक्ष भोळे यांनीही मोहिमेबाबत माहिती दिली. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर, डॉ. संदीप जैन, डॉ. तौसिफ खान, डॉ. आतिया खान, डॉ. अर्शिया शेख, डॉ. उज्ज्वला भंगाळे, डॉ. अश्विनी वर्मा, औषधनिर्माता प्रकाश तळेले व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.


टोकनवाटप असे...
लसीकरण केंद्रात नागरिकांना वेळेनुसार पालिका कार्यक्षेत्रातील पाच दवाखान्यांतर्गत सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये लसीकरणासाठी टोकनवाटप करण्यात येईल. सकाळी नऊ ते दहा बद्रीप्लॉट दवाखाना, सकाळी दहा ते अकरा महात्मा फुलेनगर दवाखाना, सकाळी अकरा ते बारा वरणगाव रोड (शिवदत्तनगर) दवाखाना, दुपारी बारा ते एक यावल रोड न. पा. दवाखाना, दुपारी दोन ते तीन खडका रोड दवाखाना, दुपारी तीन ते चार बद्रीप्लॉट दवाखाना, दुपारी चार ते पाच यावल रोड दवाखाना व महात्मा फुलेनगर दवाखाना येथे टोकन मिळतील. नागरिकांनी उपरोक्त नमूद दवाखान्यांतून टोकन घेऊन द. शि. विद्यालय या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी टोकनसह वेळेनुसार उपस्थित राहावे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT