crime crime
जळगाव

वाढदिवसाची रात्र ठरली अखेरची रात्र..तरुणाचा निर्घृण खून

मित्रांसोबत पार्टी करताना वाद झाल्याने त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ : येथील श्रद्धानगर भागातील तरुणाचा (Yong man) डोक्यात लोखंडी फावडे व लाकडी दांडा टाकून खून (Murder) करण्यात आला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री जामनेर रोडवरील गजानन महाराजांच्या मंदिर (Temple of Gajanan Maharaj) परिसरात घडली. सचिन ज्ञानदेव भगत (वय ३०, श्रद्धानगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Bhusawal Police) हद्दपार (Deported criminals )असलेला मुन्ना चौधरी याला अटक केली.
(bhusawal city kill of a young man on birthday)

मृतदेह दिसल्यानंतर शुक्रवारी सकाळी जामनेर रोडवरील दुकानदारांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. मृत सचिनचा गुरुवारी वाढदिवस होता. मित्रांसोबत पार्टी करताना वाद झाल्याने त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मृत सचिनच्या मागे १२ वर्षांचा मुलगा, नऊ वर्षांची मुलगी, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे.



पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

पत्नीने ओळखला मृतदेह
सुरवातीला मृतदेह अनोळखी म्हणून आढळला. मृताच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याने ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी मृताचे नाव निष्पन्न केले. मात्र, खात्रीसाठी मृताची पत्नी सपना हिने मृतदेह पती सचिन याचा असल्याचे सांगितल्याने ओळख पटली. या प्रकरणी सपना भगत यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. प्रशांत ऊर्फ मुन्ना चौधरी यास पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. तरुणाचा खून अन्य ठिकाणी झाला व तेथून त्याचा मृतदेह त्याच्या घराच्या परिसरात आणून टाकल्याची शक्यता आहे. यामुळे या गुन्ह्यात आणखी संशयितांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस तापस करीत आहेत.

अकरा महिन्यांत नऊ खून
ऑगस्ट २०२० ते जुलै २०२१ या अकरा महिन्यांत बाजारपेठ हद्दीत चार, शहर हद्दीत चार, तर तालुका हद्दीत एक असे नऊ खून झाले आहेत. जंक्शन म्हणून ओळख असलेल्या शहरात गुन्हेगारी थांबायचे काही नाव घेत नसून कधी घरफोडी, कधी धूमस्टाइल सोनसाखळी लांबविणे, तर कधी खुनाचे प्रकार सातत्याने घडताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT