भुसावळ : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांची (Reckless driving) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षभरात शहरात वाहतूक पोलिसांनी (Bhusawal Traffic police) नियम न पाळणाऱ्या सुमारे ३२ हजार वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ७१ लाख ८३ हजाराचा दंड वसूल केला आहे. यामध्ये ट्रिपल सीट जाणारे वाहनधारक तसेच कागदपत्रे नसणारी वाहने, परवाना नसणारे चालक आणि तोंडाला मास्क (Mask) न लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वर्षात दीड महिने लॉकडाऊन (Lockdown) असल्याने रस्त्यावर वाहने धावली नव्हती. त्यामुळे वाहतूक शाखेच्या (Police Traffic Branch) नियमित कारवाया झाल्या नाहीत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न बांधणाऱ्या व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्याची कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात आली होती.(bhusawal city thirty two thousand reckless driving traffic police action)
शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे वर्दळ असुन काही बेशिस्त वाहतूक दिसून येते. यावर उपाय म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी बेशिस्त वाहनचालकांविरुध्द मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत जानेवारी ते जून २०२१ दरम्यान ३२ हजार ९०५ केसेसमधून ७१ लाख ८३ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच ६ लाख ९,५०० रुपये पेंडींग दंड वसुल करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
१) रहादारीस अडथळा निर्माण करणे - २५० केसेस
२) वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे- १३,१३९ केसेस
३) ट्रिपल शिट वाहन चालविणे - १०५३ केसेस
४) फ्रंट सिट बसविणे - ८९ केसेस
५) वाहन चालवितांना मोबाईल फोनवर बोलणे - ६०२
६) वाहनास नंबर न टाकणे/फॅन्सी नबर प्लॅट- ७८६
७) विना हेल्मेट - १३७२
८) विना गणवेश - १४०५
९) सिट बेल्ट न लावणे - ७३४
१०) इतर मोटर वाहतूक कायद्यान्वये- १३४७५ केसेस
एकूण ३२, ९०५ केसेस
यातून ७१ लाख ८३ हजार २०० रुपये दंड आकारण्यात आलला आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
यापुढे अवैध प्रवाशी वाहतुक, बेसिस्त वाहनचालक, रिक्षाचालक विना युनिफॉर्म, विना लायसन्स, ट्रिपल शिट, मोबाईल फोनवर बोलणे, रॉग साईड वाहन चालविणे, हेल्मेट परिधान न करणे, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट वाहन, अल्पवयीन मुले वाहन चालविणे तसेच वाहतुकीस रहदरीस आडथळा निर्माण कारणारे हातगाडीधारक आदींविरुद्ध कडक कारवाई करुन सतत मोहीम राबविण्यात येत आहे.
ई-चालानमुळे काम झाले सोपे
विशेष म्हणजे यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड भरण्यासाठी वाहनचालकाला न्यायालयात अथवा वाहतूक शाखेत जावे लागत होते. मात्र, वाहनधारकांचा वेळ वाचवण्यासाठीआता ई-चालान प्रणाली कार्यान्वयित झाली आहे. ज्यामुळे वाहनचालकांकडून दंडाची रक्कम कॅश स्वरुपात तसेच महाट्रॅफीक अॅपच्या माध्यमातून वसूल करण्यात येते. ही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पोलिसांचे काम सोपे आणि पारदर्शक झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.