भुसावळ : शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये 14 रुग्ण ऑक्सीजनवर होते. बुधवारी साठा संपल्याने भाजपचे डॉ. नी. तू. पाटील यांनी स्वखर्चातून मदत केली. यानंतर त्यांनी सोशल मिडीयावरुन ऑक्सीजन सिलेंडरसाठी मदतीचे आावहन केल्याने आता अनेक दात्यांचे हात पुढे आले आहेत. गरजेनुसार तसेच ऑक्सीजनच्या उपलब्धतेनुसार रुग्णांसाठी सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे.
भुसावळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनची तिव्र टंचाई असल्याने बुधवारपासून ऑक्सीजनचा प्रश्न निर्माण झाला आहे. एजन्सींकडून पुरवठादाराला ऑक्सीजन न मिळाल्याने ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी भाजपच्या वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी सात हजार रुपये खर्च करुन दहा सिलेंडर दिले होते. यानंतर डॉ. पाटील यांनी सोशल मिडीयावर आवाहन देखील केले, यामुळे भुसावळ शहर व तालुक्यातील बऱ्याच दात्यांनी सिलेंडर उपलब्ध करुन देण्यासाठी मदतीची तयारी दाखवली आहे. शहरातील रहिवासी तथा सध्या कॅनडात स्थानिक असलेले मंगेश तुकाराम पाटील व प्राजक्ता पाटील यांनीही मदतीचा हात दिला. त्यांनीही आपले बंधू डॉ. नी. तू. पाटील यांना पैसे पाठवले. या रक्कमेतून शुक्रवारी पाच सिलेंडरची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. यासोबतच शहरातील अनेक दानशुर व सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. नी. तू. पाटील यांना संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र सध्या ऑक्सीजनच उपलब्ध नसल्याने स्थिती बिकट आहे. शहरातील दानशुरांनी आपल्या पातळीवर ऑक्सीजनचे सिलेंडर उपलब्ध करुन ते ग्रामिण रुग्णालयात उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहनही भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी केले आहे.
रुग्णांचे प्राण वाचवावे
ग्रामिण रुग्णालयात ऑक्सीजनचा पुरवठा होत नसल्याने वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी चिंतेत आहेत. मात्र भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी यासाठी मोलाचा पुढाकार घेतल्याने पुरेशी नसली तरी बऱ्यापैकी समाधानकारक मदत मिळत आहे. ऑक्सीजनचे सिलेंडर मिळून रुग्णांचे प्रमाण वाचावे, भुसावळात उपचार मिळावे, रुग्णांना हलविण्याची वेळ येवू यासाठी आपले प्रयत्न आहेत, असेही डॉ. नी. तू. पाटील यांनी सांगितले.
संपादन- भूषण श्रीखंडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.