जळगाव

अडथळा आल्यास अंध व्यक्तींना गॅझेट्सद्वारे लगेच मिळणार माहिती

लवकरच काही बदल करून ती बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे

चेतन चौधरी


भुसावळ : एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर रस्त्याने (Rode) जातांना अनेक अडचणी अंध व्यक्तींना (Blind person) भेडसावत असतात. प्रत्येक वेळी रस्ता सांगणाऱ्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जावे लागते. मात्र, आता अर्डिनो (Ardino) प्रणालीने रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारे गॅझेट्स (Gadgets)अंध व्यक्तींची मदत करणार आहे. दृष्टिबाधित लोकांना वेगाने जाण्यासाठी व अल्ट्रासोनिक लाटांच्या (Ultrasonic waves) मदतीने जवळपासच्या अडथळ्यांना जाणून घेण्यास मदत होईल आणि आत्मविश्वासाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सामर्थ्य मिळेल.(student research blind people information gadgets about obstacle)

भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव, धनश्री बऱ्हाटे, राजश्री बडगुजर या विद्यार्थिनींनी 'द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल' ही प्रणाली प्रा.धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली आहे. हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी. तिवारी व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी विद्यार्थीनींच्या या समाजोपयोगी प्रकल्पाचे कौतुक केले.

कशी काम करणार प्रणाली

इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान वापरून अर्डिनो युनो, अडथळे शोधण्यासाठी एचसी एसआर 04 अल्ट्रासोनिक सेन्सर, डीसी मोटर,बझर, रेड एलईडी, स्विचेस, पॉवर बँक, हेडर पिन या सारखी उपकरनांच्या मदतीने ही प्रणाली काम करणार आहे. डिझाइनसाठी कमी वेळ लागला व उत्पादन खर्चही कमी आहे. कमी वीज वापरासह हलके वजन असल्याने, अंध व्यक्ती हे यंत्र सर्वत्र ठिकाणी नेऊ शकेल.

पेटंटसाठी अर्ज..
ही प्रणाली वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओळखून (ध्वनिलहरी) लाटा तयार करतात आणि आवाज निर्माण होतो आणि समोर अडथळा आहे असे लगेच सूचित होते. हे दृष्टिहीन लोकांना अडथळे ओळखून आरामात चालण्यास मदत करते. त्यांना फक्त हे डिव्हाइस परिधान करणे आवश्यक आहे. सध्या या प्रणालीच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लवकरच काही बदल करून ती बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.


स्वयंरोजगाराचा मार्ग तयार केला

या प्रणालीबाबत कोमल जाधव हिने सांगितले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेत करियर घडवून स्वयंरोजगाराचा मार्ग तयार केला आहे याचा आनंद वाटतो. अंधांना प्रवासात विशेषत: अपरिचित ठिकाणी रस्ता नवखा असल्याने अडथळे येतात. त्यांना आम्ही विकसित केलेली ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे. अंध व्यक्तींना येणाऱ्या अडचणी जाणून गरजेनुसार त्यात बदल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT