भुसावळ : यंदा मान्सून (Monsoon) वेळेत आला आणि शेतकरी (Farmar Happy) आनंदला. नांगरून- वखरून तयार असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी (Farm Sowing) सुरू केली. अनेकांची पेरणी पूर्णही झाली आणि वेळेवर आलेल्या पावसाने (Heavy Rain) रौद्र रूप धारण केले. आणि शेतकऱ्यांची पेरणी वाहून गेली. (bhusawal taluka heavy rain farm crop damage)
एकीकडे जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच मुसळधार पावसाने कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शेतात पाणीच पाणी दिसत साचल्याने शेतांना तलावाचे रूप आले होते. या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
तालुक्यातील कुऱ्हे ( पानाचे ) या भागातील पेरणी आटोपली असून, गेल्या आठवड्यात गावाच्या उत्तर भागाला जोरदार पाऊस पडला. यात अनेक शेतकऱ्यांनी नुकतेच पेरणी केलेले पिके वाहून गेले. या पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला असून, शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
प्रशासनाने केला पंचनामा
कुऱ्हे (पानाचे) येथे पिके उगवणीला आली असतानाच गावाच्या उत्तर भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नुकतेच उगवलेले पीक वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सामाजिक कार्यकर्ते उत्तम काळे यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी (ता. १) तलाठी सोनवणे, कृषी सहाय्यक पवार, माजी सरपंच रामलाल बडगुजर, ग्रामपंचायत माजी सदस्य सुभाष पाटील, सुनील बारी याच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. दरम्यान, गावातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची खंत माजी सदस्य सुभाष पाटील व उत्तम काळे यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.