गणपूर (ता चोपडा) : सालदार...सालगडी, म्हणजे वर्षभर काम करणारा मजूर. खानदेशात (Khandesh) पूर्वापार सालदारकी (farmer helper) खेड्यापाड्यात दिसून येते. पण काळ बदलला तशी चाल आणि पद्धत बदलत गेली.आजच्या घडीला महिनदारी मूळे श्रमिक कामे आवरली जात असली तरी सालदारकी खानदेशातून हद्दपार (Deportation) होतांना दिसू लागली आहे.
(Khandesh farmer tradition selection farmer helper deportation)
साधारणपणे सन दोन हजार सालपर्यंत सालदारकी करणारे गावगणिक शंभरावर असत.त्यानंतरच्या काळात पहाड पट्टीतून आदिवासी बांधव सपाटीवर येऊन श्रमाची कामे करू लागली ,मात्र पारंपरिकता संपुष्टात येत सालदार पुढे महिनदार झाले आणि अलीकडे रोजनदार झाले.कालानुरूप झालेल्या बदलाला अनेक कारणे आहेत. पूर्वी मोठ्या शेतकऱ्याकडे 8 ते 10 सालदार असत आणि 8-10 बैलजोड्या असत. आता बैलजोड्याही कमी झाल्या आणि सालदार मिळणेही कठीण झाले.
जमिनीत यांत्रिकीकरण ,नवेतंत्र आले असले तरी श्रमिक कामे करणारे कमी झाले एव्हडे मात्र निश्चित. पूर्वी पहाटे चार ते रात्री नऊ असा जेवणाची वेळ वगळता कामाची वेळ होती ,ती कमी होत होत12 पुढे 10 आणि आता 7 ते 8 तासांवर आली आहे. भारत तरुणांचा देश असला तरी श्रम करण्याची मानसिकता कमी कमी होत आहे. साधारण पणे वर्षाकाठी एक लाख रुपयांची मजुरी मिळत असली तरी शेतीची कामे करण्याची मानसिकता दिवसेंदिवस कमी होतांना दिसून येते. त्यामुळे ग्रामिण भागात मजुरअभावी वेळेवर कामे होत नसल्याने शेती परावडेनाशी झाली आहे.
सालदारांचे साल काय फुटते
पूर्वी आखाजी(अक्षयतृतीया)ला सालदारांचे साल काय फुटते याची ग्रामीण भागात उत्सुकता राहत असे. मात्र आता महिन्याने कामगार मिळत असल्याने एखाद्याने एका घरी 8 ते 10 वर्षे काम करण्याची परंपरा मोडीत निघाली आहे.कामे खूप असली तरी ती करून देणारी माणसे मिळत नसल्याने ती पर्यायाने होत नाही. आता पेरणी ,कापणी ,काढणी सर्वच कामे त्यामुळे यंत्राने होत असून उन्हाळ्यात तर मजूर मिळणेच कठीण होऊ लागले आहे.
सालदारकी घटण्याची कारणे
- शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने शेतीच्या कामांची लाज वाटते,किंवा ते काम प्रतिष्ठेचे वाटत नाही.
- सालदारकीत वर्षभर अडकून राहण्यापेक्षा महिनदारी चांगली वाटते.
-काम करण्याची वृत्ती कमी होतांना दिसून येते..
-सर्विकडे पर्यायी कामे मिळत असल्याने शेती काम जडकाम म्हणून दुर्लक्ष
- ठराविक रक्कमेत काम (उधळे)करण्याची वृत्ती बळावली
- मजूर वर्ग कराराची शेती किंवा अन्य स्रोतांकडे वळत असल्याचे दिसून येते..
(Khandesh farmer tradition selection farmer helper deportation)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.