Corona test Corona test
जळगाव

जळगाव जिल्ह्यात १४ लाखावंर कोरोनाच्या चाचण्या

Jalgaon Corona : जिल्हा प्रशासनाने ‘ट्रीपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट) वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.

देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाची (Corona) साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांची प्राधान्याने कोरोना चाचणी (Corona test) करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख २२३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४२ हजार ५५२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हावासियांनी यापुढेही कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी केले आहे.

(fourteen lakh corona tests in Jalgaon district)


जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २८ मार्च २०२० ला आढळून आला होता. तेव्हापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ट्रीपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट) वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत माझे कुटूंब, माझी जबाबदारी, संशयित रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.


जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या १४ लाख २२३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांपैकी ९ लाख २८ हजार २३६ व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी ८४ हजार ७३२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर ४ लाख ७१ हजार ९८७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पैकी ५७ हजार ८२० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. १ हजार ९०४ इतर अहवाल आढळले असून सध्या ३०८ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.



त्वरित निदान, त्वरित उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींस कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच जिल्हावासियांनी यापुढेही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT