Collector Abhijit Raut 
जळगाव

कायद्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लूट थांबवणार-जिल्हाधिकारी राऊत

गेल्या चार- पाच वर्षात जे नवीन केळी व्यापारात आलेत त्यांनी कोणतेही लायसेन्स न घेता ते कोट्यवधींचा व्यापार करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शेतकऱ्यांनी (Farmer) तक्रार दिल्यास गुन्हे दाखल केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut)यांनी शुक्रवारी केळी उत्पादकांना दिले.

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना गेल्या तीन- चार वर्षांपासून बाजार भावापेक्षा निम्मे भाव मिळत आहे. त्यात दिवसाला जिल्ह्यात किमान १५ कोटी तर वर्षाला कित्येक हजार कोटींची लूट शेतकऱ्यांची होत असल्याचे शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले, त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी अधिकारी, शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे पदाधिकारी यांची बैठक घेतली.


शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी गेल्या चार पिढ्यांपासून शेतकरी व्यापारी संबंध असताना कधीच जळगाव जिल्ह्यात लूट झाली नाही. परंतु गेल्या चार- पाच वर्षात जे नवीन केळी व्यापारात आलेत त्यांनी कोणतेही लायसेन्स न घेता ते कोट्यवधींचा व्यापार करीत असून, बाहेरील व्यापाऱ्यांना बाजार भावापेक्षा कमीत माल मिळवून देऊ असे सांगतात व त्यामुळे बाहेरील व्यापारी देखील चांगल्या व्यापाऱ्यांकडून कमी दरात माल मागतात व नाइलाजाने जिल्ह्यातील सर्व माल कमी भावात जात आहे, हे लक्षात आणून दिले. त्यांना वचक बसावा, ही अपेक्षा व्यक्त केली.


चोपडा येथील आदर्श शेतकरी डॉ. रवींद्र निकम यांनी भावासह बरेच व्यापारी वजन मापातदेखील लूट करीत असल्याचे लक्षात आणून दिले. व जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केळी हे फळ असल्याचे सांगून जिल्हाधिकारीमार्फत केळी फळांचे दर्जा सुधारण्यासाठी सरकारकडे अनुदानाची मागणी केली असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा सहकार अधिकारी संतोष बिडवाई यांनी केले. पोलिस विभागामार्फत श्री. ससे, आयकर विभागचे प्रतिनिधी डॉ. रवींद्र निकम, भागवत महाजन, मनीष महाजन, ॲड. कुलदीप पाटील, किरण गुर्जर, सचिन शिंपी, संदीप पाटील, काँग्रेस जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, प्रा. सुभाष पाटील (अमळनेर), शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणेश पाटील, रवी चौधरी उपस्थीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT