जळगाव : रात्री साडेतीनची वेळ...पिंप्राळ्यातील प्रशांत चौकात राहणारे कुटुंबीय (Family) गाढ झोपेत... अचानक पलंगावर झोपलेल्या मुलाला मांजरीच्या (Cat)फिस्करण्याच्या आवाजाने जाग आली. समोरचे दृश्य पाहून त्यांचे अवसान गळाले...जमिनीवर झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना नागापासून (Indian cobra snack) वाचविण्याच्या प्रयत्नात मांजरीची त्या नागाशी झटापट सुरू होती.
(cat saved the sleeping family from the cobra)
अनंत कोळी यांच्या कुटुंबातील चार महिला जमिनीवर झोपलेल्या होत्या. त्यांच्याजवळ मांजर अंगावरचे सगळे केस ताठ करून फिस्करत होती. कारण मांजरासमोर काळरात्र बनून आलेला नाग (इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा) होता. मुलाने जोरात ओरडत सर्वांना उठवले. इकडे नाग आणि मांजराची लढाई सुरू असतानाच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना पाचारण करण्यात आले.
नागाल सोडले सुरक्षीत अधिवासात
सहकारी अजय साळवे यांना घेऊन ते घटनास्थळी पोचले. तोपर्यंत मांजर हवालदिल झाली होती. श्री. सोनवणे यांनी कुशलतेने नाग ताब्यात घेतला आणि कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. अनंत कोळी यांनी गणेश सोनवणे यांचे आभार मानत वन्यजीव संरक्षण संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. नागाला फारशी उपचाराची गरज नसल्याने मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक आणि बाळकृष्ण देवरे यांना माहिती देत तत्काळ सुरक्षित अधिवासात मुक्त केले.
माझ्यापेक्षा त्या मांजराचे आभार मानले पाहिजे. या दिवसात खाली झोपलेल्या नागरिकांना सर्पदंश होण्याचा धोका जास्त असल्याने खाली झोपणे टाळा, स्वच्छता ठेवा.
-गणेश सोनवणे, सर्पमित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.