जळगाव

दुर्गम गावामध्ये अनोखा उपक्रम..मासिकपाळी बद्दल जनजागृती

सॅनिटरी नॅपकिन डेमोक्रॅटिक इंडियन या संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगावः नवरात्र उत्सवाच्या (Navratra Festival) निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रम होत असतात आणि त्यात महिला शक्तीचा जागर होत असतो. याच धर्तीवर जिंदगी फाउंडेशनने (Zindagi Foundation) चाळीसगाव तालुक्यातील जुनोने आणि नाईक नगर तांडा या अतिशय दुर्गम गावात महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल (Menstruation) जनजागृती केली. जुनोने हे गाव कन्नड घाटाच्या वरच्या बाजूला आहे. त्यामुळे हे गाव दुर्गम भागात (Remote Areas) मोडते. जिंदगी फाउंडेशनने गावातील महिला आणि किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सर्व महिला आणि किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले.

जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळी विषयी शास्त्रीय माहिती सांगितली. मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. सॅनिटरी नॅपकिन वाटतांना कपड्याऐवजी महिलांनी सॅनिटरी पॅड वापरावे हा सल्ला सुद्धा दिला. सॅनिटरी नॅपकिन डेमोक्रॅटिक इंडियन या संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आले होते. याच कार्यक्रमात जिंदगी फाउंडेशनकडून सर्व महिलांना साड्या तसेच मुलींना ड्रेस वाटण्यात आले.

या कार्यक्रमाला जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव, सचिव अजय पाटील, ममता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही. पी. पाटील सर, जुनोने गावचे सरपंच गोरखनाथ राठोड, उपसरपंच संजय भिल्ल, चैतन्य तांडाचे सरपंच दिनकर राठोड, कृषी सहाय्यक तुफान खोत, सम्राट सोनवणे व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवनेरी फाउंडेशनने परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT