जळगाव ः कोणी पक्ष सोडला तर भाजपाला काही फरक पडत नाही. एकनाथ खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत (Ncp) प्रवेश केला. परंतु, राष्ट्रवादीत जाऊन त्यांना काय मिळाले? प्रवेश करताच त्यांना मंत्रिपद का दिले नाही? असा प्रश्नही सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे ( BJP General Secretary Chandrasekhar Bavankule) यांनी उपस्थित करून अप्रत्यक्षपणे खडसेंना ( NCP Leader Eknath Khadse) टोला लगावला.
(chandrasekhar bavankules allegation that ncp did not give the post minister eknath khadse)
भाजयुमोतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘युवा वॉरियर’ अभियानांतर्गत जळगावी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना उत्तर महाराष्ट्र कोरडा असून या भागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश संघटन चिटणीस अनुप मोरे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. श्री. बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राज्यात एकही पालकमंत्री काम करत नाहीत. मंत्री आपल्या पदाचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थ व मतदारसंघासाठी करीत आहेत. राज्याची चिंता सरकारला नाही. विदर्भात एक हजार कोटींचा तांदूळ घोटाळा झाला. आता रेशनचा तांदूळही या सरकारला पुरला नाही, असे या सरकारचे काम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता सरकारला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
‘जलयुक्त’ची होऊ द्या चौकशी
जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली आहे त्यात कोणताही अपहार झाला नसून आरोप करण्यापेक्षा चौकशी करा. हे केवळ योजनेच पैसे वळविण्यासाठी व योजना बंद पाडण्याचे कारस्थान आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारमुळेचे गेल्याचा आरोप देखील यावेळी बावनकुळे यांनी केला.
उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ
नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात एकीकडे पाऊस नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी दुबार पेरणीसाठी हताश झाले आहेत. त्यांना दुबार पेरणीसाठी अनुदान देणे दूर मात्र या सरकारच्या मंत्र्यांना एकमेकांच्या उण्यादुण्या काढण्यातच वेळ पुरत नाही. नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात पावसाची गंभीर स्थिती आहे. हे जिल्हे दुष्काळी जाहीर करावा, अशी आपली शासनाकडे मागणी आहे.
खडसेंवर भाजपकडून अन्याय नाहीच
एकनाथ खडसेंबाबत विचारले असता श्री. बावनकुळे म्हणाले, एकनाथ खडसेंचे भाजप वाढविण्यात मोठे योगदान होते. पक्षात त्यांचा आदर व सन्मानच होता. त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे पक्षाचे आमदार काम करत होते. फडणवीसही त्यांचा आदर करतात. खडसेंनी पक्ष सोडला हा त्यांचा निर्णय होता. भाजपने त्यांच्यावर अन्याय केला, असे म्हणणे चुकीचे आहे.
महाविकास आघाडीचे सरकार दुराचारी
महाविकास आघाडी सरकारमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी कामे केले जात असून जनता, शेतकऱ्यांशी त्यांना काही घेणे देणे नाही. भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र भारनियमनमुक्त झालेला असताना आघाडी सरकारने राज्यावर पुन्हा भारनियमन लादले, असा आरोप करत आघाडी सरकार प्रचंड दुराचारी असल्याची टीका माजी मंत्री तथा सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.