जळगाव : कोविड-19 (covid-19) व म्युकरमायकोसिस (Mucormaycosis) बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर्स (doctor), पॅरामेडिकल स्टॉफ (Paramedical staff) यांना उपचाराबाबत मार्गदर्शनासाठी ४० तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची (Task Force) पुर्नस्थापना करण्यात आली आहे. (collector abhijit raut task force rebuilt covid mucormaycosis)
जिल्ह्यात सद्य:स्थितीत म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण आढळून येत असून या रुग्णांसाठी उपचार व संभाव्य धोका असणाऱ्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच उपलब्ध करणे आवश्यक असल्याने हा फोर्स गठीत केला आहे.
असे असतील तज्ज्ञ
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने स्थापन या टास्क फोर्समध्ये जिल्ह्यातील दंतरोग, कान, नाक घसा तज्ज्ञ, नेत्ररोग, बालरोग, भूलतज्ज्ञ, भिषक अशा ४० तज्ज्ञांचा समावेश असेल. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयातील तज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव हेदेखील असतील.
याबाबत देतील सूचना
टास्क फोर्सचे सदस्य कोविड-19 व म्युकर मायकोसीस बाधित रुग्ण व क्रिटीकल असणाऱ्या रुग्णांसह इतर रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांना आवश्यक तो औषधोपचार करणेसाठी, कोविड बाधित रुगणांची संख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन करतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
(collector abhijit raut task force rebuilt covid mucormaycosis)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.