जळगाव

कोरोनाने शिकविले नैसर्गिक ऑक्सिजनचे महत्त्व, आणि झाडे लावण्याचा घेतला वसा ! 

देविदास वाणी

जळगाव  ः तुम्हाला कृत्रिम ऑक्सिजनने वाचविले, म्हणून तुम्ही बरे झालात. घरी गेल्यानंतर नैसर्गिक ऑक्सिजन मिळण्यासाठी किमान दहा झाडे लावा, त्यांचे संगोपन करा, असा सल्ला जिल्हा कोविड रुग्णालयातील बेड साईड असिस्टंटनी कोरोनामुक्त झालेल्यांना दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या रुग्णांनी घरी गेल्यावर प्रत्येकी दहा वृक्ष लावले. एकूण २४ कोरोनामुक्त रुग्णांनी आता नैसर्गिक ऑक्सिजनसाठी तब्बल २४० झाडांची लागवड केली आहे. यावरच ते थांबले नाहीत, तर या झाडांच्या संगोपनाचा संकल्पही त्यांनी सोडला आहे. 

जिल्हा कोविड रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी बेड असिस्टंटचा पॅटर्न जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयात राबविला जात आहे. यामुळे कोरोनाबाधितांशी मनमोकळा संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवून, ते या व्याधीतून मुक्त कसे होतील, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा कोविड रुग्णालयात आत्तापर्यंत ३० बेड असिस्टंट नेमले असून, ते रुग्णांशी आपुलकीने संवाद साधत त्यांची इच्छाशक्ती वाढवीत आहे. जेव्हा रुग्ण बरे होऊन घरी जातात, तेव्हा ते मेडिकल स्टाफसह बेड असिस्टंटचे आभार मानतात. यावेळी प्रामुख्याने हे असिस्टंट त्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगतात. कृत्रिम ऑक्सिजन घेऊन आपण जगलो, पण नैसर्गिक ऑक्सिजन अधिकाधिक आपण कसा मिळवू शकतो, हेही ते रुग्णांना पटवून देतात. त्याचे परिणाम आता दिसून लागले आहेत. त्यांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या आवाहनाला रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

९७ पैकी २४ जणांनी लावली झाडे 
जिल्हा कोविड रुग्णालयातून बेड साईड असिस्टंटच्या समुपदेशनातून ९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यांना वृक्ष लागवडीचा सल्ला दिला गेला. त्यापैकी २४ रुग्णांनी झाडे लावली. पुढील काळात त्यांचे संवर्धन, संगोपन करण्याचे आश्‍वासनही दिले आहे. 

कोविड रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णांना बरे झाल्यानंतर तुम्हांला ऑक्सिजनने वाचविले आहे. आता नैसर्गिक ऑक्सिजन मिळण्यासाठी झाडे लावा, असे सांगण्यात येते. आतापर्यंत २४ बरे झालेल्या ररुग्णांनी झाडे लावली. त्याची छायाचित्रेही त्यांनी मला पाठविली आहेत. कोविड रुग्णांची सेवा आमच्या हातून घडते, हे मोठे कार्य आहे. 
- मुकेश सावकारे, 
बेड साईड असिस्टंट 

आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून बेड साईड असिस्टंटचे काम करतो. रुग्णांचे मनोबल वाढवून रुग्णांना रोगाशी सामना करण्यासाठी त्यांना तयार करतो. आमच्या घरातील व्यक्ती असे समजून त्यांना सर्वतोपरी मदत करतो. त्यांचे व आमचे एक नातेच यानिमित्ताने तयार होते. 
- कृष्णा सावळे 
बेड साईड असिस्टंट  

सपांदन- भूषण श्रीखंडे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Waze: शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात सचिन वाझेला जामीन

David Warner भारताविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी सज्ज! निवृत्ती मागे घेण्याच्या तयारीत, म्हणाला...

Vidhan Sabha Election: हिंदूंच्या ध्रुवीकरणासाठी 'संत संमेलन'! विधानसभेच्या प्रचारासाठी साधुसंत मैदानात

प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांना नोटीस; लाखोंचे ९ चेक झाले बाउन्स, कोटींची आहे थकबाकी

Latest Maharashtra News Updates Live : सचिन वाझेंना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT