जळगाव

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैकुंठधामात दोन हजारांवर अंत्यविधी

एप्रिल ते ऑक्टोबर असे सुमारे सहा-सात महिने पहिल्या लाटेची तीव्रता होती

सचिन जोशी


जळगाव : कोरोनाच्या (corona) दोन्ही टप्प्यांपैकी दुसऱ्या लाटेत (second wave)अधिक जीवितहानी झाली. दुसऱ्या लाटेत वाढलेल्या मृत्युसंख्येमुळे (Death) कोविडसाठी (covid-19) राखीव केलेल्या एकट्या नेरीनाका स्मशानभूमीत (Cemetery) गेल्या तीन महिन्यांत तब्बल दोन हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.(corona second wave jalgaon nerinaka cemetery funeral on corpses)


कोरोनाच्या एप्रिल २०२० मधील ‘एन्ट्री’नंतर सव्वा वर्षात मधले दोन महिने वगळता राखीव असलेली ही स्मशानभूमी शुक्रवारपासून ‘कोविड’मुक्त करण्यात आली आहे. तरीही तेथील चार ओटे कोरोना रुग्णांसाठी राखीव आहेत.

पहिल्या लाटेची स्थिती...
एप्रिल २०२० पासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुर्दैवी ‘एन्ट्री’ झाली. नंतर रुग्ण वाढू लागले, तसे मृत्यूही वाढले. त्यामुळे मे २०२० पासून नेरीनाका स्मशानभूमी कोविडसाठी राखीव करण्यात आली. एप्रिल ते ऑक्टोबर असे सुमारे सहा-सात महिने पहिल्या लाटेची तीव्रता होती. या पहिल्या लाटेत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी वेटिंगची स्थिती आली नाही. तरीही सहा महिन्यांत जवळपास दोन हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कटू प्रसंगांची साक्षीदार...
नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे दोन-तीन महिने ही स्मशानभूमी पुन्हा सामान्य मृतदेहांसाठी खुली झाली. मात्र, पुन्हा फेब्रुवारीच्या अखेरीस रुग्ण, मृत्यू वाढू लागल्यानंतर वैकुंठधाम कोविडसाठी राखीव करण्यात आले. दुसऱ्या लाटेतील अनुभव विदारक होते. मृतांची संख्या वाढल्याने अक्षरश: वेटिंगवर मृतदेह ठेवावे लागले. अगदी स्मशानभूमीचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ आली. या लाटेत अवघ्या तीन महिन्यांतच स्मशानभूमीत दोन हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यविधी झाले.


गॅसदाहिनीची मदत
कोविडच्या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या मोठी होती. यादरम्यान ३१ जानेवारीला लोकार्पण झालेल्या गॅसदाहिनीची मोठी मदत झाली. या पाच-सहा महिन्यांत गॅसदाहिनीत आतापर्यंत तीनशेपेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव अत्यंत विदारक, दुर्दैवी होता. अनेकांनी कुटुंबातील सदस्य, नातलग गमावले. अंत्यविधीसाठी नातलगही पुढे यायला तयार नव्हते. अशा वेळी माझ्यासह सहकारी काशीनाथ बिऱ्हाडे, पंढरी बिऱ्हाडेंनी दाहसंस्कारांची जबाबदारी पार पाडली. अशा धोकादायक वातावरणात ईश्‍वरानेच कामासाठी शक्ती दिली.
-धनराज सपकाळे, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT