जळगाव : उपमहापैार कुलभूषण पाटील (Deputy Commissioner Kulbhushan Patil) यांच्यावर रविवारी (ता. २५) चौघांनी गोळीबार (Firing) केल्याचा गुन्हा रामानंदनगर पोलिस ठण्यात (Ramanandnagar police station) दाखल आहे. दाखल गुन्ह्यात सोमवारी दोन संशयितांना पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने अटक केली असली, तरी उपमहापौरांच्या घरावर खरोखर गोळीबार झाला आहे किंवा नाही, याचे प्रमाण अद्यापही पोलिसांना गवसलेले नाही.
(jalgaon deputy mayor kulbhushan patil firing case)
उपमहापैार कुलभूषण पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अनिल यादव यांच्यासोबत दुचाकीवर उपमहापौर घराकडे येत असताना पिंप्राळ्याच्या जुन्या लाकडी वखारीसमोर चारचाकीतून आलेल्या महेंद्र व उमेश राजपूत या दोघांनी पिस्तूल रोखत शिवीगाळ व दमदाटी केली. पिस्तूल पाहून घराकडे आल्यावर त्यांच्या मागावर आलेल्या त्याच कारमधील हल्लेखोर खाली उतरले त्यापैकी एकाने उमहापौराच्या दिशेने, तर दुसऱ्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या दिशेने गोळीबार केला. घटनास्थळावर मात्र, पोलिसांना खाली पितळी राउंड (पुंगळी) मिळण्याऐवजी शाबूत गोळी सापडली. हल्लेखोरांकडे पिस्तूल होतीच हे जरी सत्य असले तरी त्यातून खरोखर गोळीबार झाला आहे किंवा नाही, याबाबत पोलिसही ठाम नाहीत. कारण गोळीबार झाल्याच्या कुठल्याच खाणाखुणा किंवा पुरावे घटनास्थळावर आढळले नाही. राज्यात सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर असताना याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारीही सांभाळूनच तोंड उघडतात.
पोलिस अधीक्षकांना निवेदन
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना महेंद्र राजपूत यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात आणि तोंडी माहिती देताना गोळीबारावर प्रश्न उपस्थित केला आहे. इतकेच नाही, तर निव्वळ प्रसिद्धीसाठी आणि लक्ष विचलित करण्यासाठी कांगावा होत असल्याचे सांगण्यात आले. गुन्ह्यातील दोन्ही सख्ये भाऊ उच्चशिक्षित असून, महेंद्रने ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा केला असून, उमेश एमबीए झालेला आहे. उमेशचे सिमेंटचे दुकान आणि बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय असून, त्याचे नितीन राजपूत याचेकडे पैसे घेणे होते. या वादात कुलभूषण पाटील यांनी उडी घेत, ‘पैसे देतच नाही, काय करून घ्यायचे ते करा’, असा दम दिल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.