Mahavitaran Mahavitaran
जळगाव

जमिनीत विद्युत प्रवाह; वायरमन व तरूण बचावले, दोन म्‍हशींचा मृत्यू

जमिनीत विद्युत प्रवाह; वायरमन व तरूण बचावले, दोन म्‍हशींचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

धानोरा (जळगाव) : येथून जवळच असलेल्या मोहरद येथे गावाला विज पुरवठा करणाऱ्या डिपीतून जमिनीत विज प्रवाह (electric current buffalo death) उतरून शाॅक लागून दोन म्हशींचा मृत्यू झाला. तर म्हशी घेऊन जाणारा तरूण थोडक्यात बचावला. तसेच घटनास्थळी आलेला कंत्राटी वायरमनला देखी विजेचा धक्का लागला; मात्र तो दुर झाल्याने तोही बचावल्याची धक्कादायक घटना घडली. (jalgaon-dhanora-village-light-current-two-buffalo-death)

मोहरद येथे गावाला सिंगल फेज विजपुरवठा (Singal fage current) करण्यासाठी दोन डिप्या आहेत. त्यापैकी गावहाळजवळ असलेल्या १ नंबर डिपीवर आर्थिंगची वायर तुटून डीपीच्या जवळपास १० ते १५ फुटाच्या परिसरातील जमिनीत विजेचा प्रवाह उतरला होता. याच वेळी हसीना गुलशेर तडवी या शेतमजूरी करणाऱ्या महिलेच्या दोन म्हशी त्यांचा मुलगा रसूल गुलशेर तडवी हा घेऊन हाळकुंडाजवळ म्‍हशींना पाणी पाजण्यासाठी आला असता अचानक म्हशी डीपीच्या दिशेने ओढल्या गेल्या व जोरदार विजेचा झटका लागून मृत झाल्या.

म्हशी हाकणारा तरूण व वायरमन बवाचला

डोळ्यासमोर म्हशी डिपीकडे ओढल्या जाऊन तरफडत असतांना त्यांना हाकलून नेणारा तरूण रसूल तडवी याने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का लागून तो बाजूला फेकला गेला. सुदैवाने तो वाचला. सदरील घटना गावातीलच कंत्राटी वायरमन सलीम तडवी याला माहिती होताच, तोही घटनास्थळी येवून डिपी बंद करण्यासाठी जात असतांना त्यालाही विजेचा धक्का लागला. तो वेळीस समयसुचकता दाखवत बाजूला झाल्याने मोठी दुदैवी घटना टळली.

गतवर्षीही १२ वर्षीय मुलाचा मृत्‍यू

धानोरा विज मंडळाच्या भोंगळ कारभाराने गेल्या वर्षी येथील जि. प. शाळेजवळ असलेल्या लोखंडी खांबात विज प्रवाह उतरून जवळच खेळणाऱ्या सहावीत शिकणारा बारा वर्षीय मुलाचा मृत्‍यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती. तरीही येथील विजमंडळाच्या कारभारात फरक पडलेला दिसत नाही. आता आठ दिवसांपासून सदर डिपीवर आग लागून विज प्रवाह उतरत असल्याची माहिती ग्रा.पं.चे शिपाई सत्तार तडवी यांनी दिली असल्‍याचे त्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली असता दिली. त्यामुळे आणखी कोणाचा जिव जाण्याची प्रतीक्षा धानोरा विज वितरण कार्यालत करत होते की काय? असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. सदरील घटनेची अडावद पोलीस स्टेशनला हसीदा तडवी यांच्या तक्रारीवरून नोंद झाली असून स.पो.उप निरिक्षक जगदीश कोळंबे यानी पंचनामा केला आहे. त्यात ८० हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद आहे.

मदतीसाठी प्रस्ताव पाठवणार

सदरील घटनास्थळाला भेट देऊन माहीती घेतली असता डीपीवरील आर्थिगची वायर तूटून घटना घडली आहे. याबाबत पशूधन मालकाला मदतीसाठी माझ्या कडील सर्व बाबी पुर्ण करून प्रस्ताव वरिष्ठांना लवकरच पाठवणार आहे.

– डी. डी. घरजारे, स.अभियंता महावितरण कार्यालय धानोरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT