जळगाव

जळगाव जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा !

मॉन्सुनकाळात आपत्ती प्रवणक्षेत्रात पुरेसा धान्यसाठा व वितरण करण्याचे नियोजन करावे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आगामी मॉन्सून (Monsoon) कालावधीत जिल्ह्यात महसूल विभागाने (Revenue Department) आपत्ती व्यवस्थापन आराखडा (Disaster Management Plan) तयार करावा. शोध व बचाव साहित्याची तपासणी करून सर्व साहित्य सुस्थितीत ठेवावे. आपत्तीजन्य परिस्थिती उद्‍भवल्यास सर्व यंत्रणांनी (Systems update) आपापसांत समन्वय ठेवून परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी आज केले.(disaster management meeting collector abhijeet raut information redy plan systems update)

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मॉन्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की मॉन्सुनकाळात आपत्ती प्रवणक्षेत्रात पुरेसा धान्यसाठा व वितरण करण्याचे नियोजन करावे. अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मॉन्सूनकाळात धान्य पुरवठ्याचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत पुरेसा औषधसाठा करून ठेवावा. आवश्यक औषधसाठ्याची मागणी नोंदवावी, जलजन्य व किटकजन्य आजार होऊ नयेत, याबाबत दक्षता घ्यावी.

धरणनिहाय आराखडा करा

पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून पूररेषा निश्चित करावी. धरणातून विसर्ग सुरू करणार असल्यास त्याबाबतची माहिती दवंडी, सायरण यंत्रणेद्वारे द्यावी, हवामान खात्याकडून येणारे संदेश शेतकऱ्यांना वेळेत पोचविण्याचे काम कृषी विभागाने करावे. बांधकाम विभागाने रस्त्यांवरील पूल, पडणारी झाडे, तसेच पाझर तलाव यांची पाहणी करून घ्यावी, तर पालिकांनी आपल्याकडील अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. वीज वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्स्फॉर्मर, धोकादायक पोल यांची दुरुस्ती करावी. आपत्तीच्या काळात कोणीही पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही, याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

ACMC Solar Holding : एसीएमसी सोलर होल्डिंग्सच्या आयपीओकडून गुंतवणुकदारांची निराशा, शेअर्स 13% डिस्काउंटवर लिस्ट...

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

SCROLL FOR NEXT