जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी नवे बाधित कमी व बरे होणारे रुग्ण अधिक असे दिलासादायक चित्र दिसून आले. १०३३ नव्या रुग्णांची नोंद होताना ११०३ रुग्ण बरे झाले. मात्र, तिशीतील दोघा तरुणांसह आज पुन्हा २० जणांचा बळी गेल्याने मृत्युदराची चिंता कायम आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत उद्रेक अधिक तीव्र आहे. गेल्या महिनाभरापासून हजार, बाराशेवर नवे रुग्ण समोर येत आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांत नवे रुग्ण कमी व बरे होणाऱ्यांची संख्या थोडी जास्त असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही काही अंशी घटली आहे.
११०३ रुग्ण बरे
शुक्रवारी ८ हजार ९३० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १०३३ नवे बाधित आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १ लाख ७ हजार १०३वर पोचली आहे. तर गेल्या २४ तासांत ११०३ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा ९३ हजार ९७६वर पोचला आहे. तीन दिवसांत सक्रिय रुग्णसंख्याही कमी होऊन ती ११ हजार २३९ एवढी आहे.
तरुणींसह २० जणांचा मृत्यू
रुग्णसंख्या स्थिर असली तरी जिल्ह्यातील मृत्यूदर वाढतच आहे. सलग तिसऱ्या दिवशी २० रुग्णांचा कोरोनाने बळी गेला. आज जळगाव शहर व यावल तालुक्यातील प्रत्येकी ४ रुग्ण तर अन्य ठिकाणचे १२ असे २० रुग्ण दगावले. त्यात ३० व २६ वर्षीय महिलांचा समावेश आहे.
जळगाव, भुसावळसह अमळनेरला संसर्ग
नव्या रुग्णसंख्येत जळगाव शहरासह अमळनेर, भुसावळ, चोपड्यात संसर्गाचे प्रमाण कायम आहे. जळगावला शुक्रवारी २१२ रुग्ण समोर आले, मात्र त्या तुलनेत दिवसभरात तब्बल ३४० रुग्ण बरे झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या घटली. भुसावळ तालुक्यात १३० नव्या रुग्णांची नोंद झाली. जळगाव ग्रामीण ५८, अमळनेर १०५, चोपडा ८७, पाचोरा ७९, भडगाव १०, धरणगाव ५३, यावल ३०, एरंडोल ४९, जामनेर १९, रावेर ८४, पारोळा २७, चाळीसगाव ३७, मुक्ताईनगर ३२, बोदवड १ अन्य जिल्ह्यातील २०.
संपादन- भूषण श्रीखंडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.