Jalgaon District Bank Election 
जळगाव

खडसे, महाजन मनोमिलनासाठी गुलाबरावांची शिष्टाई सफल होणार?

जिल्हा बँकेत एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी निवडणुका झाल्या त्या वेळी ते भारतीय जनता पक्षात होते.

कैलास शिंदे

केंद्रात सहकार मंत्रिपद निर्माण केले आहे. भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांच्याकडे हे मंत्रिपद आहे. त्यामुळे भाजपही आता ‘सहकार’कडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसत आहे.



जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांचा वाद सर्वश्रुत आहे; मात्र जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) दोघांना एकत्र आणून बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यासाठी शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) मध्यस्थी करणार आहेत. त्यांची शिष्टाई सफल होणार काय? याकडेच आता जिल्ह्याचे लक्ष आहे.


भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. दोघे टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला आहे. मात्र आता जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघडी म्हणून एकत्र आहेत. मात्र भारतीय जनता पक्षासोबत येणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेत एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी निवडणुका झाल्या त्या वेळी ते भारतीय जनता पक्षात होते. आता ते राष्ट्रवादीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे पक्षाकडून तेच जळगाव जिल्ह्यात निर्णय घेतील. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाजन यांचीही सहमती असणे आवश्यक आहे.


मुंबईत नेत्यांची खलबते
बिनविरोध निवडणुकीसाठी आता भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मुंबईत डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार व जिल्हा बँक संचालक चिमणराव पाटील, भाजप आमदार व जिल्हा बँक संचालक संजय सावकारे, शिवसेना आमदार व जिल्हा बँक उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी भेट घेतली. भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचीही भेट घेण्यात येत आहे, त्यासाठी शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप सहभागी होईल का?
गिरीश महाजन आता खडसेंसोबत एकत्र येण्यास तयार होणार काय, हाच प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष सहकार क्षेत्रात फारसे लक्ष देत नव्हता, मात्र आता केंद्रात सहकार मंत्रिपद निर्माण केले आहे. भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांच्याकडे हे मंत्रिपद आहे. त्यामुळे भाजपही आता ‘सहकार’कडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत सहकारात दुसऱ्याच्या नेतृत्वात भाजप सहभागी होईल का, हाच प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : संविधानावर बोलताना राहुल गांधींचा माईक झाला बंद, सुरु होताच म्हणाले, कितीही प्रयत्न करा, पण...

Potato : सर्वांच्या लाडक्या बटाट्याचा जन्म भारतातला नाहीच ! बटाट्याच्या भाजीच्या अनेक पद्धती काय ? जाणून घ्या आरोग्याचे फायदे

Pan Card Update : महत्त्वाची बातमी! बंद होणार जुने पॅनकार्ड, जाणून घ्या नव्या पॅन कार्डसाठी किती खर्च येईल

Farmers Income: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 20,000 रुपये

IPL Auction: १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी राजस्थानने का मोजले १ कोटी! द्रविडने सांगितलं कारण; वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT