Farmer loan Farmer loan
जळगाव

जिल्हा बँक आघाडीवर, खरीप हंगामासाठी सरासरी ५० टक्के कर्ज वाटप

जिल्हा बँकेने ७४९ कोटी २९ लाख उद्दीष्टापैकी ५०० कोटी १० लाख रूपये कर्जवाटप केले आहे

देविदास वाणी

जळगाव ः खरीप हंगामात (kharif season) शासनातर्फे (government) देण्यात आलेल्या उद्दीष्टापैकी सरासरी ४९.४४ टक्के खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले. यात राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती बँक (District Central Bank), खाजगी, प्रादेशिक ग्रामीण बँकापैकी जिल्हा बँक अग्रेसर असून आतापर्यत १ लाख २७ हजारांहून अधिक शेतकर्‍यांना ५०० कोटी १० लाख सरासरी ८४ टक्के पीक कर्जाचे (crop loan) वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली. (jalgaon district central bank farmer crop loan disbursed)



यंदा कोरोना संसर्ग प्रादूर्भावामुळे अडचणीत आलेल्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाकडून खरीप व रब्बी हंगामासाठी २२०० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. मार्चअखेर सुमारे दीड लाखांच्यावर शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली. आतापर्यत १ लाख ४३ हजार ७४५ शेतकर्‍यांना ७९८ कोटी ६ लाख १८ हजार रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. राष्ट्रीयकृत बँकांनी १ हजार ९२ कोटी ६० लाख २७ हजार उद्दीष्टापैकी फक्त १३ हजार ३६८ शेतकर्‍यांना २२२ कोटी ३४ लाख ८ हजार रूपये (२९.०९टक्के) तसेच खाजगी बँकांनी २७५९ शेतकर्‍यांना ६८ कोटी २३ लाख ५१ हजार (२९.३९टक्के) आणि प्रादेशिक ग्रामीण बॅकांकडून ७९८ शेतकर्‍यांना ९ कोटी १६ लाख ५९ हजार (५०.६३टक्के) असे
एकूण ७९८ कोटी ६ लाख १८ हजार रूपये खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले.


यंदा खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी देण्यात आलेल्या २२०० कोटी रूपये उद्दीष्टापैकी १ लाख ४३ हजार ७४५ शेतकऱ्यांना ७९८ कोटी ६ लाख १८ हजार रूपये पीककर्ज वाटप करण्यात आले. यात जिल्हा बँकेने ७४९ कोटी २९ लाख उद्दीष्टापैकी ५०० कोटी १० लाख रूपये कर्जवाटप केले आहे. मे अखेर ५० टक्के तर जून अखेर ८४ टक्के पीककर्ज वाटपात यावर्षी जिल्हा बँक आघाडीवर आहे.

- संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT