corona graph corona graph
जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उतरता आलेख सुरूच

सकाळ डिजिटल टीम



जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (corona graph) उतरता आलेख सुरूच आहे. दुसऱ्या लाटेत ( corona second wave) बुधवार (ता. २३)चा दिवस मृत्यूशिवाय (Death) नोंदला गेला. दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची (Patient) भर पडली, तर सुमारे १६९ रुग्ण बरेही झाले. (jalgaon district corona new patient graph down)

जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला. मे व जून महिन्यात नव्या रुग्णांसह सक्रिय रुग्णांमध्ये कमालीची घट आली. जूनच्या शेवटच्या टप्प्यात रोजच्या रुग्णांचा आकडा पन्नाशीच्या आत स्थिर झाला आहे. बुधवारी प्राप्त साडेचार हजार चाचण्यांच्या अहवालात अवघे ४३ नवे रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येने एक लाख ४२ हजार ७२ चा आकडा गाठला. जिल्ह्यातील बरे होणाऱ्यांची संख्या आता एक लाख ३८ हजार ४१२ झाली असून, रिकव्हरी रेट ९७.४२ टक्क्यांवर गेला आहे.


जळगाव शहर शंभरीच्या आत
पहिल्या व दुसऱ्या लाटेतही हॉटस्पॉट ठरलेले व सक्रिय रुग्णसंख्या हजारावर गेलेले जळगाव शहर तीन महिन्यांत प्रथमच शंभरीच्या आत आले आहे. जळगाव शहरात सध्या अवघे ८७ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ९१ आहे.


...असे आढळले रुग्ण
जळगाव शहर- १४, जळगाव ग्रामीण- एक, भुसावळ- चार, चोपडा- दोन, पाचोरा- दोन, भडगाव- एक, धरणगाव- तीन, यावल- दोन, एरंडोल- तीन, जामनेर- चार, रावेर- दोन, पारोळा- एक, चाळीसगाव- तीन, बोदवड- एक.


...असे झाले लसीकरण
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य लसीकरण केंद्रांवर बुधवारी दिवसभरात सहा हजार ९५० जणांना पहिला डोस देण्यात आला, तर ९५६ जणांनी दुसरा डोस घेतला. तरुणाईचा लसीकरणास प्रतिसाद मिळत असून, बुधवारी सहा हजार ५०१ लाभार्थी १८ ते ४४ वयोगटांतील होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT