जळगाव

पंन्नास दिवसांनी मोठा दिलासा..मृत्युचा आकडा प्रथमच दहाच्या आत !

सकाळ वृत्तसेवा



जळगाव : रमजान ईद (Eid) व अक्षय्य तृतीयेचा (akshay tritiya) दिवस कोरोना (corona) संसर्गाच्या दृष्टीने जिल्ह्याला दिलासा देणारा ठरला. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या दीड महिन्यात प्रथमच मृत्युचा (Death) आकडा एकअंकी म्हणजे ९ एवढा नोंदला गेला. तर नव्या रुग्णांची (New Patient) संख्याही सातशेच्या आत नोंदविण्यात आली.


(jalgaon district corona patient deth numbers low)

मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचे चित्र आहे. १४ एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम आता दुसऱ्या महिन्यात दिसू लागला आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत नवे केवळ ६८१ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार ८९३वर पोचली. तर ८११ रुग्ण दिवसभरात बरे झाले असून बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २१ हजार ७८२वर पोचला आहे.


चाचण्याही घटल्या
शुक्रवारी रुग्णसंख्या घटल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात प्राप्त चाचण्यांच्या अहवालाचा आकडाही कमी होता. गेल्या २४ तासांत केवळ ५ हजार ७१० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. विशेष म्हणजे त्यात रॅपिड ॲन्टीजेन (२६४४)पेक्षा आरटीपीसीआर (३०६६) चाचण्यांची संख्या अधिक आहे.


बळींचा आकडा एकअंकी
गेल्या किमान ५० दिवसांपासून दैनिक मृत्युंचा आकडा दोनअंकी होता. गेल्या आठवड्यापर्यंत तर दररोज २० किंवा त्यापेक्षा अधिक मृत्यू होत होते. आठवडाभरापासून ही स्थितीही सुधारली. तर शुक्रवारपर्यंतच्या गेल्या २४ तासांत ९ बळींची नोंद झाली. त्यामुळे एकूण बळींचा आकडा २३९५ वर पोचला आहे. कोविड संशयित, सारी, न्युमोनिया यासारख्या आजारांनी ७ जण दिवसभरात दगावले.

प्रत्येक तालुका शंभराच्या आत
शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जळगाव शहरासह कोणत्याही तालुक्यात नव्या रुग्णसंख्येने शंभरी पार केली नाही. सर्वाधिक ९२ रुग्ण चाळीसगाव तालुक्यात आढळून आले. जळगाव शहरात केवळ ६० नवे रुग्ण आढळले, तर त्यापेक्षा तिप्पट म्हणजे १८९ रुग्ण बरे झाले.
अन्य ठिकाणी आढळेले रुग्ण असे : जळगाव ग्रामीण १६, भुसावळ ८२, अमळनेर २९, चोपडा ६८, पाचोरा ४, भडगाव ३, धरणगाव २९, यावल ३२, एरंडोल ४४, जामनेर १६, रावेर ४७, पारोळा ३५,मुक्ताईनगर ७२, बोदवड ३४, अन्य जिल्ह्यातील १८.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT