जळगाव : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेची (second wave) तीव्रता अधिक होती. संसर्ग वेगाने (Infection rapidly) वाढला तसे रुग्ण (Patient) बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले. मे व जून या दोन महिन्यांतच दहा हजारांवर रुग्ण रिकव्हर (Patient Recover) झाले. सरत्या जून महिन्यात सक्रिय रुग्णसंख्येत साडेचार हजारांनी घट होऊन सद्य:स्थितीत सक्रिय रुग्ण सहाशेच्या टप्प्यात आले आहेत. (jalgaon district corona second wave patient recover increase)
कोरोनाच्या पहिल्या लाटेला जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरवात झाली. जून ते सप्टेंबरदरम्यान पहिल्या लाटेचा ‘पीक’ आला. ही लाट ऑक्टोबरपासून ओसरत जाऊन जानेवारीपर्यंत स्थिती सामान्य झाली.
फेब्रुवारीपासून वाढला संसर्ग
मात्र फेब्रुवारीच्य दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात पुन्हा संसर्ग वाढू लागला व दुसऱ्या लाटेची तीव्रता सुरू झाली. या वर्षीही मार्च, एप्रिलमध्ये संसर्गाचा ‘पीक’ येऊन गेला. एप्रिलअखेरपर्यंत स्थिती भीषण बनलेली होती. रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळणेही कठीण झाले होते. रेमडेसिव्हिर इंजेक्शनसह अन्य औषधांचाही तुटवडा निर्माण झाल्याचा अनुभव आला. मे महिन्यापासून संसर्ग आटोक्यात येऊ लागला. मे व जून महिन्यांत रिकव्हरीचे प्रमाणही वाढले.
रुग्णसंख्येत मोठी घट
मे व जून या दोन महिन्यांत सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली. १ मेस जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या दहा हजार ५२० होती, ती ३१ मेपर्यंत घटून पाच हजार ५७९ वर आली. १ जूनला पाच हजार १३८ सक्रिय रुग्ण होते, ते ३० जूनपर्यंत घटून ६६४ पर्यंत संख्या आली. म्हणजे एकट्या जून महिन्यात तब्बल चार हजार ४७४ रुग्ण घटले. आता जूनच्या अखेरीस स्थिती बऱ्यापैकी सामान्य झाल्याचे चित्र दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.