भडगाव : सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यात जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगाम पुर्णपणे पाण्यात गेला. राज्य शासनाने वाढीव दराने मदत देण्याचे जाहीर केले. काल शासनाने दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाईपोटी 2 हजार 800 कोटी दिले. या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 5 लाख हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. मात्र शासनाने जळगाव जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. एक रूपया ही भरपाई यात जिल्हाला मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात जाणार आहे. याबाबत शेतकऱ्यांकडुन संतप्त प्रतिक्रीया ऐकायला मिळाल्या.
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महीन्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला. तब्बल पाच लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पाण्यात बुडाला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने खरीप हंगामासाठी केलेला खर्चही शेतकऱ्यांना निघाला नाही त्यामुळे जिल्ह्यातला बळीराजा नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून विषेशत: आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांची भेट देऊन शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत करावी अशी मागणी लावून धरली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात मागणी केली. त्यानंतर शासनाने एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक मदत देण्याचे जाहीर करून शेतकर्याना 10 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. काल अनुदान वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय जाहीर केला. मात्र यात जळगाव जिल्ह्याचे मदतीच्या यादीत नावच नाही.
जिल्ह्याच्या तोंडाला पुसले पाने
काल राज्य शासनाने मदतीबाबतचा आदेश दिला. यात ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढिव दराने 2 हजार 800 कोटी रूपयाचे अनुदान दिवाळीपुर्वी देण्याचे जाहीर केले. राज्यातील 14 जिल्ह्याना ही मदत देऊ केली आहे. मात्र अतिवृष्टीने जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णतः पाण्यात गेल्यावर ही या मदतीत जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला एक रुपयाही आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. एकीकडे महा विकास आघाडीचे नेते शेतकर्यांना दिवाळीपूर्वी अनुदान वितरित करण्याची मागणी करत आहे. मात्र प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्याला या मदतीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकर्याना वाढिव दराने मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर वाढिवदराने मदत शासनाने जाहीर केली. मात्र काल देऊ केलेल्या 2 हजार 800 कोटीच्या मदतीत जळगाव जिल्ह्याला एक रूपयाही मिळाला नाही. त्यामुळे आजच याबबात मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहोत.
-किशोर पाटील, आमदार पाचोरा-भडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.