जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४० हजार ८९ नागरिकांना कोरोना लसीचा (corona vaccination) पहिला डोस तर १ लाख ३१ हजार ४० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला असून आतापर्यंत एकूण ५ लाख ७१ हजार ४८९ लाभार्थ्यांना कोरोनाची (corona) लस देण्यात आली आहे. (jalgaon district five million corona vaccination)
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार (District Health Officer Dr. Bhimashankar Jemadar) यांनी माहिती दिली. शासनाच्या (Government) निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरवात करण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षावरील सहव्याधी (को-मॉर्बिड) व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर १ मे ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले.
तालुका, केंद्रनिहाय माहिती अशी
अमळनेर तालुक्यात १० हजार १३३ लाभार्थ्यांना पहिला डोस तर ४ हजार ४१० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भुसावळ ३५८६१ (१४७६८), बोदवड ४०१५ (११९८), भडगाव ५८५३ (१९८२), चाळीसगाव ९६९१ (३३७७), चोपडा ७८६१ (२२८८), धरणगाव ५६०३ (१६६८), एरंडोल ५१८६ (१८५३), जामनेर ७८६७ (४३५१), मुक्ताईनगर ५५५४ (१९७९), पाचोरा ९२७५ (३४६६), पारोळा ६१६९ (२६५६), रावेर १०६२८ (४२७७), यावल ९७८८ (४४८३), जळगाव ७४६०७ (२३०८५).
प्राथमिक आरोग्य केंद्र १ लाख ५२ हजार २७० (४०४१६), प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ३५८८९ (४५०४), प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील खाजगी रुग्णालये 39896 (9379), विश्वप्रभा खाजगी रुग्णालय ३९४३ (१२६०) याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४० हजार ८९ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर १ लाख ३१ हजार ४०० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आल्याचेही डॉ. जमादार यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.