जळगाव ः जिल्हयात पावसाने (Heavy Rain) आतापर्यंत लावलेल्या दमदार हजेरीने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात (Dam) ७९.४० टक्के उपयुक्त जलसाठा (Water Reservoir) निर्माण झाला आहे. वाघूरसह अन्य मध्यम ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गिरणा प्रकल्पात ६८.४२ टक्के पाणीसाठा आहे.
जिल्हयात सप्टेंबर अखूर मान्सून परतीच्या प्रवासाला सुरूवात होते. मात्र अजूनही जिल्ह्यात काही दिवस काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा आहे. मान्सूनच्या सुरूवातीला हवामान विभागाने सरासरीनुसार पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. जून-जुलैच्या सुरूवातीला मान्सूनने तब्बल १५ ते २० दिवसांचा खंड पावसाने दिला होता. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. मान्सून सरासरी पर्जन्यमानानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान आतापर्यत १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयातील प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक चांगला आहे.
जिल्ह्यातील मोठया प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पात गेल्या चोवीस तासात ५५.२१ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. हतनूर प्रकल्पात ८०.५९ टक्के, तर गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ९ मि.मी पावसासह ३.१३ दलघमी पाण्याची आवक झाली असून प्रकल्पात ६८.४२ टक्के पाणीसाठा आहे. वाघूर प्रकल्पासह अभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा, अग्नावती, तोंडापूर, बोरी आणि मन्याड आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. मोर ९२.७४, बहुळा ९९.८, अंजनी ८७.५६, गुळ ४७.९७ तर सर्वात कमी जलसाठा भोकरबारी १६.८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
गिरणा प्रकल्पातून वर्षभर पाणी
जिल्हयातील अनेक तालुके तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजना सर्वात मोठया गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत. गिरणा प्रकल्प २००८ नंतर गेल्या दोन वर्षापासून पूर्ण क्षमतेने भरत आहे. १७ सप्टेंबर २०१९ व १७ सप्टेंबर २०२० असे योागायोगाने गिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाच हजार क्यूसेक व नंतर प्रकल्पात होणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली होती. परंतु यावर्षी उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे गिरणा प्रकल्प आणि या प्रकल्पांच्या वर असलेल्या चणकापूर ९७, अर्जूनसागर ९७.७६ असा पाणीसाठा असून हरणबारी, केळझर, नागासाक्या या प्रकल्पातून होणार्या विसर्गामुळे सद्यस्थितीत केवळ ६८.४२ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.