जळगाव : तीन वर्षांपासून ‘अंडर ट्रायल’ (Under trial) सुरू असलेल्या एरंडेाल ‘डबल मर्डर’ खटल्यातील संशयिताचा जिल्हा रुग्णालयात (District Hospital) मृत्यू झाला. कारागृह (Prison) प्रशासनाच्या हलगर्जीमुळे पवनच्या उपचारात दिरंगाई होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाच्या उपस्थितीत ‘ईन-कॅमेरा’ सरकारी पंचासमक्ष शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.
(jalgaon district jail death of a prisoner)
कारागृह प्रशासन जबाबदार
पवनला दहा दिवसांपासून त्रास होत होता. त्याने रुग्णालयात दाखल करण्याची विनवणी केली हेाती. कारागृह प्रशासनाने वेळीच योग्य दखल घेत जिल्हा रुग्णलयास त्याच्या आजाराबाबत माहिती दिली असती, तर कदाचित वेळीच उपचार होऊन तो आज जिवंत असता. कारागृहात मनमानी कारभार करणारे अधिकारी व प्रशासनामुळेच त्याचा जीव गेल्याचे पवनचा मामा श्याम महाजन याने सांगितले. संबंधितांवर कारवाई होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला.
ईन-कॅमेरा शवविच्छेदन
पवनचा मृत्यू झाल्यानंतर नियमानुसार वैद्यकीय समितीसमक्ष शवविच्छेदन करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश वैभव जोशी यांच्या उपस्थितीत विविध वैद्यकीय विद्याशाखांचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने शवविच्छेदन केले. निरीक्षक विलास शेंडे, शासकीय पंच-साक्षीदारांसह पवनचा भाऊ आणि मामा उपस्थित होता.
या गुन्ह्यात होती अटक
६ सप्टेंबर २०१८ ला एरंडोल येथे कबड्डी स्पर्धेत मुलींची छेड काढल्यावरून वाद होऊन झालेल्या हाणामारीत प्रा. मनोज पाटील यांच्या घरावर हल्ला चढवला होता. त्यात उमेश पाटील व आबा पाटील यांचा खून झाला होता. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, पंकज नेरकर, भरत महाजन, राहुल महाजन, पवन महाजन ७ सप्टेंबर २०१८ पासून अटकेत आहेत.
एरंडेाला पोलिस बंदोबस्त रवाना
मृत पवन महाजन याचा मृतदेह घेऊन सायंकाळी साडेसहाला नातेवाईक एरंडोलकडे रवाना झाले. एरंडोल शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, मोजक्याच नातेवाइकांना अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पवनला त्रास होत असल्याने २० जुलैस डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात त्यास तपासणीला पाठविले होते. तेथून परत आल्यावर औषधोपचार सुरू होते. गुरुवारी (ता. २२) परत त्रास होऊ लागल्याने त्याला सकाळीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहा दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. कारागृहात कुठलेही उपोषण सुरू नाही.
-अनिल वाडेकर, अधीक्षक, जिल्हा कारागृह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.