रावेर ः येथे बायोडिझेल (Biodiesel) मध्ये रॉकेल मिश्रीत करून अवैधरित्या राॅकेल (Raquel) मिश्रीत अवैध साठा करुन चालते फिरते बायोडिझेलचे पंप (Invalid biodiesel pump) अॅपेरिक्षा वाहनावर तयार करुन नमुद बायोडिझेल हे नावाजलेले कंपनीची डिझेल प्रमाणेच असे भासवुन जनतेच्या विश्वासघात करुन शासनाची व वाहतुकदार जनतेची फसवणुक केल्या प्रकरणी रावेर पोलिसांनी (Raver Police) दोन जणांना अटक केली असून रॉकेल, बायोडिझेल सह ३ लाख ६७ हजार रु . कीमतीचे साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे.
(jalgaon district raver city invalid biodiesel pump police action)
या बाबतचे वृत असे की येथील पोलीसांना बऱ्हाणपुर रोडवरील गोपी ट्रान्सपोर्ट अँण्ड तोल काटा समोर, तसेच फकीर वाडा भागात पाताळगंगा रोडवर आरोपी पत्री शेड (गोडाऊन ) मध्ये बायोडिझेल मध्ये रॉकेल मिश्रीत करून अवैधरित्या राँकेल मिश्रीत अवैध साठा करून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन्ही ठिकाणी अवैधरित्या राॅकेल मिश्रीत बायोडिझेल राॅकेल मिश्रण करुन अवैध साठा करुन चालते फिरते बायोडिझेलचे पंप अॅपेरिक्षा वाहनावर तयार करुन नमुद बायोडिझेल हे नावाजलेले कंपनीची डिझेल प्रमाणेच असे भासवुन जनतेच्या विश्वासघात करुन शासनाची व वाहतुकदार जनतेची फसवणुक केली असल्याची खात्री पटल्याने शे.शरीफ शे.मुस्लिम (वय ३८),शे.फिरोज शे.मुस्लिम वय २७) दोन्ही रा. तिरुपती नगर , रावेर हे त्यांचे कब्जात अवैधरित्या विक्री व साठवणुक करतांना एकुण २७०५ लिटर राॅकेल मिश्रीत बायोडिझेल साहीत्य व साधनासह एकुण रुपये ३,६७,२६० रुपयाचे मालासह मिळुन आले.
यात २,४०,९०० रुपये किंमतीचा माल त्यात एक ७० हजार- रुपये किंमतीची लाल रंगाची अँपे रिक्षा क्रमांक एम एच १२ एफ डी ८१९४ असलेली यात ९० हजार रुपयाची एक (amspa ) कंपनीचे बायो डिझेल विक्री करण्याचे पंप मशिन, १२ हजार रुपये किमतीची एक SF SONIC JT- 150 R बॅटरी, ६८ हजार ४०० रुपयाचे ९५० लिटर राॅकेल मिश्रीत बायोडिझेल एक हजार लिटर मापाची प्लाॅस्टीकची टाकीत, ५०० रु किं.चे एक बायो डिझेल लिहीलेले बोर्ड, १ लााख २६ हजार ३६० रुपये किंमतीच्या ७ प्लास्टिकच्या २ लोखंडी २०० लिटर मापाच्या टाक्या पैकी , ८ टाक्या पुर्ण भरलेल्या एक टाकी अर्धी भरलेली, एक ३५ लिटर, एक २० लिटर मापाची पुर्ण भरलेली असे एकुण १७५५ लिटर राॅकेल मिश्रीत बायो डिझेल रावेर पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबतसदरची कारवाई डी वाय एस पी नरेंद्र पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, ए पी आय शितलकुमार नाईक, पी एस आय मनोहर जाधव, पी एस आय मनोज वाघमारे,हे कॉ जावरे, पो ना नंदू महाजन,पो ना महेंद्र सुरवाडे,पो कॉ सचिन घुगे,पो कॉ प्रदीप सपकाळे,पो कॉ प्रमोद पाटील,पो कॉ सुकेश तडवी,पो कॉ महेश मोगरे,पो कॉ पुरुषोत्तम पाटील ए एस आय राजेंद्र करोडपती,पो कॉ सुरेश मेढे,पो कॉ विशाल पाटील,पो कॉ मंदार पाटील,पो कॉ कुणाल पाटील,हे कॉ भागवत धांडे यांनी कारवाई केली आहे. या बाबत पुरवठा निरीक्षक रावेर तहसील वाकोजी नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केलेले आहे.या प्रकरणाचा तपास पो. नि.रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.