Tiger 
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील वाघांचा अधिवास धोक्यात..

तीन-चार वर्षांपासून या वनक्षेत्रात अतिक्रमणे वाढत असून, परप्रांतीय मेंढपाळांचे वास्तव्य वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा


कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : पट्टेदार वाघांसाठी (Tiger) प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील वढोदा वनक्षेत्राला (Vadoda forest area) विविध समस्यांनी ग्रासले असून, याकडे वेळीच लक्ष पुरविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. याबाबत उपवनसरंक्षक विवेक होसिंग व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश राऊत (Collector Dr. Avinash Raut) यांना निवेदन दिले आहे.


वढोदा वनक्षेत्रात आठ-दहा पट्टेदार वाघांचा कायमस्वरूपी अधिवास असून, इतर हिंस्र प्राण्यांसह तृणभक्षी प्राण्यांची संख्या मुबलक आहे. मात्र, अतिक्रमण, अवैध वनचराई व वृक्षतोडीसारखे गैरप्रकार बळावले असून, मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे याचा विपरीत परिणाम थेट स्थानिकांवर होत आहे.


कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज
निवेदनात म्हटल्याप्रमाणे मागील काळात वनक्षेत्रपाल डी. आर. पाटील असताना वनसंरक्षणाची जबाबदारी सक्तीने पार पाडली. कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ दिले नाही. त्या वेळी मेंढपाळांवर कारवाई होत असल्याने अवैध वनचराईला आळा बसला होता. मात्र तीन-चार वर्षांपासून या वनक्षेत्रात अतिक्रमणे वाढत असून, परप्रांतीय मेंढपाळांचे वास्तव्य वाढले आहे. जंगलातील कुरण, गवत नष्ट झाले. परिणामी, वन्यप्राणी शेतीशिवाराची वाट धरत आहेत व पिकांचे नुकसान होत आहे. जंगल व वनहद्दीच्या शेतीत मोठे नुकसान होत असून, संबंधितांनी याकडे वेळीच लक्ष पुरविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

वन विभागाची डोळेझाक
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वनक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पासाठी प्रयत्नशील आहेत. वनक्षेत्राचा कारभार प्रभारी वनाधिकाऱ्यांकडे सोपवून वन विभाग निर्धास्त आहे. वन विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून होत असलेल्या दुर्लक्षामुळे वनोपराध करणाऱ्यांना फावत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत व उपवनसंरक्षक विवेक होसिंग यांना जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, वैशाली तायडे, मोहिनी गायकवाड, सोनाली पवार, माजी सदस्य सुभाष पाटील, वढोदा संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवा पाटील, संदीप जावळे, दुई सुकळी, कमलसिंग राठोड जोंधनखेडा, इतबार तडवी, इंदल चव्हाण, सुभाष धाडे आदींनी निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT