Farmer Farmer
जळगाव

‘पोकरा’ अर्थसहाय्याची २२ हजारांवर शेतकऱ्यांना संजीवनी

या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ८७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

सचिन जोशी


जळगाव : जागतिक बँकेचे (World Bank) अर्थसहाय्य उपलब्ध असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात, ‘पोकरा’ योजनेंतर्गत (Pokra’ schemes) जिल्ह्यातील २२ हजार ५०० शेतकऱ्यांना (Farmers) व्यक्तिगत, तर १७ शेतकरी गटांना सुमारे १२३ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले. आधुनिक शेतीची (Modern agriculture) कास धरून वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसह त्यांच्या गटांना ही योजना खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरतेय. (jalgaon district twenty two thousand pokra schemes got the benefit)



२०१६ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने राज्यात ‘पोकरा’ अंतर्गत शेती विकासासाठी व्यक्तिगत व शेतकरी गटांना जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून अनुदान देण्याची योजना सुरू केली. या योजनेत त्या वेळी कृषिमंत्री असलेल्या एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्याचाही समावेश केला. २०१८ पासून ही योजना कार्यान्वित झाली.

अशी आहे योजना
या योजनेत पाच हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास आधुनिक यंत्रणा उभारणीसाठी व्यक्तिगत तसेच नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी अथवा गटांना प्रस्ताव प्रकल्प मूल्य खर्चाच्या ६० टक्के किंवा ६० लाखांपपर्यंत अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे.


२२ हजारांवर शेतकरी लाभार्थी
या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ८७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पैकी २२ हजार ५२८ शेतकऱ्यांना विविध शेती उपकरणे, अवजारे व यंत्रणेसाठी १२० कोटी ७० लाख ९१ हजार ५७१ अनुदान वितरित करण्यात आले आहे, तर शेतकरी गटही या योजनेचे लाभार्थी असून, अशा १७ गटांना दोन कोटी २५ लाख ९८ हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.


‘पोकरा’ योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून, त्यातून शेती, शेतकऱ्यांच्या विकासाचे ध्येय आहे.
- संजय पवार
प्रकल्प विशेषज्ञ



व्यक्तिगत लाभार्थींची स्थिती
प्रकार-------------लाभार्थी---अर्थसहाय्य
ठिबक------------१२०४४---७८४३७३६३३
शेततळे--------------५७-----१६३१५०१६
शेततळे अस्तरीकरण---२८-----२२३३३४२
तंत्रज्ञान प्रोत्साहन------२६२-----७३१८००
फळबाग लागवड------२६७-----८८८६०७६
मत्स्यपालन -----------०३-----३१६०६
पॉलिहाउस, शेडनेट---३६९०-----६८४६२३०३
विहिर पुनर्भरण---------२४------१८५५०६
तुषार सिंचन, वॉटरपंप----१०९३---१५०२०८७४
बीजोत्पादन----------६१९-------४३५८५६
रेशीम उत्पादन---------१८-------१०७६९०७
शेडनेट हाउस---------१३१------२११८३६६७४
बंदीस्त शेळीपालन----१६०१------५४९१०९०८
तुषार सिंचन----------३१४------५४५७१७७
वॉटर पंप------------२३६२-------३१६१८७६०
इतर-----------------०४----------४६८४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT