Eknath Khadse 
जळगाव

किती ही त्रास द्या..मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही-एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा


जळगाव ः मी पक्ष बदलला म्हणून `ईडी`ची चौकशी (ED Inquiry) लावून मला विनाकारण त्रास दिला. मला बदनाम केले तरी मी झुकणार नाही आणि घाबरणार ही नाही असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी भाजपला (BJP) दिला आहे.


जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते.या वेळी बोलताना ते म्हणाले, ज्याने भ्रष्टाचार केला त्याला कायद्याने शिक्षा व्हायला हे आपले मत आहे. परंतु ज्या माणसाच्या चार वेळा चौकश्या झाल्या आहेत, लाचलुचपत विभाग,इन्कम टॅक्स विभाग यांनी चौकश्या केल्या त्यात त्यांना काहीही आढळले नाही.तरी आपली ईडी मार्फत चौकशी करून विनाकारण छळ केला जात आहे. आपल्या चौकशीचे निव्वळ राजकारण केले जात आहे हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे.मला कितीही त्रास दिला तरी मी थांबणार नाही, विरोधकांना काय वाटेल ते वाटेल ' मी पुन्हा येईल ' असे म्हणत त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.


जावयाचा विनाकारण छळ
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही खडेसेंची चौकशी लावली या विधानाचा समाचार घेऊन खडसे म्हणाले,माझी ईडी ची चौकशी त्यांनी लावली हे त्यांनी मान्य केले त्या मुळे मी त्यांचा आभारी आहे. त्या मुळे महाराष्ट्राला माझी चौकशी सुरू आहे हे कळले. परंतु हा त्रास देणे योग्य नाही. किमान माझ्या जावयाला तरी त्रास द्यायला नको होता. त्यांनी काहीच केले नाही, त्यांना राजकारण माहीत नाही, ते २० वर्षांपासून परदेशात नोकरी करत आहेत. त्यांचा या प्रकरणात केवळ दोन कोटींचा व्यवहार आहे. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. योग्य वेळी जनता त्याला उत्तर देईल.

मी थांबणार नाही
एकनाथ खडसे यांनी आपल्याला त्रास दिला तरी आपण थांबणार नाही असा इशारा दिला,' रुक जाना नही.. तू हारके काटो मे चलेंके मिलेंगे रस्ते बहार के' या गाण्याच्या ओळी त्यांनी एकविल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT