mahavitaran sakal
जळगाव

एकदा वीजचोरी पकडल्‍यानंतर पुन्हा फेरफार; महावितरणकडून गुन्हा दाखल

एकदा वीजचोरी पकडल्‍यानंतर पुन्हा फेरफार; महावितरणकडून गुन्हा दाखल

राजेश सोनवणे

जळगाव : एरंडोल शहरातील एक वीजग्राहक दुसऱ्यांदा वीजचोरी (costmer Power theft) करताना पकडल्याने महावितरणने (Mahavitaran) त्यावर थेट पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. (jalgaon-erandol-mahavitaran-costmer-power-theft-and-police-case)

एरंडोल येथील साईनगरमध्ये राहणाऱ्या शिरीष पुंडलिक गायकवाड या ग्राहकाकडे घरगुती वीजजोडणी आहे. मात्र हा ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करत असल्याचा संशय आल्याने त्याचे मीटर जप्त करण्यात आले. महावितरणने प्रयोगशाळेत मीटर तपासले असता त्याची गती कमी करून वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. तब्बल ९ हजार ५०५ युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणकडून या ग्राहकास २ लाख ५४ हजार ३६८ रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. ग्राहकाने बिल भरले तर नाहीच; परंतु यापूर्वीही हा ग्राहक वीजचोरी करताना आढळला होता.

यापुर्वीही सापडली होती चोरी

डिसेंबर २०१९ मध्ये मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी या ग्राहकास १० हजार ३६५ रुपये वीजचोरीचे बिल व तडजोड शुल्क ८ हजार रुपये आकारण्यात आले होते. मात्र त्यावेळी ही रक्कम भरून सदर गुन्ह्यात ग्राहकाने तडजोड केली होती. मात्र आता घरगुती वीज वापरासाठी दुसऱ्यांदा वीजचोरी पकडल्याने या ग्राहकाविरुद्ध महावितरणने थेट पोलिसांत धाव घेतली. महावितरणच्या एरंडोल शहर कक्षाचे सहायक अभियंता कुणाल तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरीष पुंडलिक गायकवाड या ग्राहकाविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये जळगावातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई महावितरणच्या एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT