यंदाच्या रब्बी हंगाम 2020- 21 अंतर्गत राज्यामध्ये ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाने तीन लाख क्विंटल उद्दिष्ट निश्चित केले होते.
जळगाव : जिल्ह्यात यंदा 90 हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे (Buy sorghum) उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 50 हजार क्विंटल खरेदी झाली तर अद्याप 40 हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट बाकी आहे. त्यात 31 जुलैपासून नोंदणीकेलेल्या शेतकऱ्यांचे वाहनांच्या रांगा केंद्रावर आहे. त्यामुळे राज्य शासनाने खरेदीच्या मुदतवाढीचा प्रस्ताव त्वरित केंद्राकडे पाठवून तातडीने खरेदी केंद्र सूरू करावे अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांच्या कडे केली आहे.
मंत्री भुजबळ यांना दिलेल्या पत्रात खासदार पाटील यांनी म्हटले आहे की यंदाच्या रब्बी हंगाम 2020- 21 अंतर्गत राज्यामध्ये ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाने तीन लाख क्विंटल उद्दिष्ट निश्चित केले होते. खरेदीसाठी अंतिम मुदत दि. 31 जुलै 2019 पर्यंत होती. परंतु दि. 31 जुलै 2021 पर्यंत राज्यात फक्त 1 लाख 84 हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आलेले असून सुमारे 1 लाख 16 हजार क्विंटल उद्दिष्ट अद्याप शिल्लक आहे. खरेदी केंद्रावर वेळीच नोंदणी करून देखील त्यांच्या कडून शासनाने ज्वारी खरेदी केलेली नाही. या मुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तर अनेक शेतकऱ्यांना वाहनाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. या करिता खरेदीला मुदतवाढ मिळणेसाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला मागणी प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने खरेदीच्या मुदतवाढीचा प्रस्ताव त्वरित पाठवणे यावा. जेणेकरून शिल्लक असलेल्या ज्वारीची वेळीच खरेदी होऊ शकेल आणि बळीराजास दिलासा मिळेल.अशी मागणी पत्रातून केली आहे.
३१जुलै पूर्वी नोंदणी तरी शेतकऱ्यांवर अन्याय
जिल्हयातील प्रत्येक खरेदी केंद्रांवर ३१जुलै रोजी राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपआपली तसेच अनेकांनी भाडोत्री वाहने घेऊन ज्वारी विक्री साठी आणली होती. त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. आधीच कोरोना महामारीत शेतकरी आर्थिक संकटात असताना राज्य सरकारने शेतकऱ्याची थट्टा केली आहे. या विरोधात शेतकऱ्यांच्या मनात आक्रोश असून लवकरात लवकर खरेदीस मुदतवाढ मिळावी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा. अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.