जळगाव

बैलगाडीसह शेतकरी दांपत्य नाल्याच्या पुरात गेले वाहून

नाल्याच्या पाण्यात बैलगाडी टाकताना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अचानक लोंढा वाहत आला

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : निंभोरा (ता. धरणगाव) येथील दांपत्य शेतातील (Farm) काम आटोपून घराकडे परतत असताना नाल्याला आलेल्या लोंढ्यात बैलगाडीसह (Bullock cart) वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. १५) सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने पत्नी बचावली असून, पती मात्र वाहून गेल्याने बेपत्ता झाले आहे. अपघातात बैलगाडीला जुंपलेले दोघे बैल मृत्युमुखी (Death) पडले असून, नाल्यातच ते मृतावस्थेत आढळून आले. सायंकाळी सातपर्यंत घटनास्थळाजवळ आणि रात्री उशिरापर्यंत नाल्याच्या काठावरील गावांत (Village) शोधकार्य (Research work)सुरू होते. मात्र, अंधार दाटल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

(farmer couple with the bullock cart carried away in the flood of nala)


निंभोरा येथील भागवत भिका पाटील (वय ५५) व त्यांच्या पत्नी मालूबाई (५०) हे शेतकरी दांपत्य गुरुवारी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस वाढण्याची शक्यता असल्याने पाटील दांपत्य बैलगाडीने घरी परतत होते. तासाभरापूर्वी झालेल्या पावसामुळे निंभोरा ते खामखेडा या दोन्ही गावांमधून जाणाऱ्या ‘खैरी’ नाल्याचे पाणी वाढत जाऊन पूर आला. नाल्याच्या पाण्यात बैलगाडी टाकताना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अचानक लोंढा वाहत आल्याने नाल्यात अर्धवट उतरवलेल्या बैलगाडीसह भागवत पाटील यांच्यासह पत्नी मालूबाई वाहून गेले.



सुदैवाने मालूबाई वाचल्या...
बैलगाडीसह वाहून गेल्यानंतर मालूबाई पाटील नाल्याच्या काठावरील झुडपांमध्ये अडकल्या. मात्र, भागवत पाटील व दोन्ही बैल पाण्यात दूरपर्यंत वाहत गेले. थोड्या अंतरावर दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला तर वाहून गेलेले भागवत पाटील बेपत्ता झाले. भागवत पाटील यांच्यामागोमाग शेतातून घराकडे परतणाऱ्या ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात आल्याने तातडीने त्यांनी गावातील इतर ग्रामस्थांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण गाव नाल्याच्या काठी एकवटले. शोधकार्यादरम्यान ग्रामस्थांना झुडपामध्ये अडकलेल्या मालूबाई आढळून आल्याने त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना लगेच धरणगाव येथे हलवण्यात येऊन त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


घटनास्थळी तहसीलदारांची भेट
निंभोऱ्याचे पोलिसपाटील गुलाब सोनवणे यांनी तत्काळ तहसीलदार व पोलिस ठाण्यात कळवले. प्रभारी तहसीलदार प्रथमेश मोहोळ, पोलिस अधिकाऱ्यांनी निंभोरा गावाकडे धाव घेत घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांकडून त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. पुराच्या पाण्यात वाहून गेलेले भागवत पाटील यांचा शोध घेण्यात आला. परंतु, रात्री उशिरापर्यंत ते मिळून आले नाहीत. नाल्याला मोठा पूर आल्याने आणि अंधार वाढत असल्याने शोधकार्यात प्रचंड अडचणी आल्या. अखेर रात्री शोधकार्य थांबवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT