जळगाव : राज्यात स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे (Chief Minister) दावेदार समजता आणि जिल्हा बँकेत (District Bank Election) बिनविरोध होण्यासाठी विरोधी उमेदवाराचा खोटा दाखला देऊन बिनविरोध होण्यासाठी पळपुटेपणा करतात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते व राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन ( MLA Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress) नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांच्यावर केली.
येथील जी. एम. फाउंडेशनच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदूलाल पटेल, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ आदी उपस्थित होते.
आमदार गिरीश महाजन म्हणाले, की राज्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. त्यांना एक पैसाही भरपाई देण्यात आलेली नाही. त्यांच्याकडे लक्ष देण्यास शासनाला वेळ नाही. मात्र, एका आर्यन खानला वाचविण्यासाठी पूर्ण राज्य सरकार कामाला लागले आहे. कायद्याने होईल ते होईल. मात्र, एका व्यक्तीला कारागृहातून जामीनावर सोडविण्यासाठी पूर्ण राज्य सरकार कामाला लागले आहे, असे चित्र आज प्रथमच पाहत आहोत. हा प्रकार अत्यंत वाईट व निषेधार्ह आहे.
खडसेंचा पळपुटेपणा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, की एकनाथ खडसे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार समजतात आणि जिल्हा बँकेत संचालकपदासाठी आपल्या विरोधी उभे असलेल्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यासाठी दबाव आणला. त्यांचा अर्ज रद्द करण्यासाठी त्यांच्या बुडलेल्या पतसंस्थेचे कर्ज असल्याचा खोटा दाखला आणला, हा सर्व प्रकार कशासाठी केला आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ आदींचा अर्जही बाद केला. काही जणांचे अर्ज त्यांनी रातोरात बदले आहेत. केवळ उमेदवार बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने हा पळपुटेपणा केला, असा आरोपही त्यांनी केला.
होय, विश्वासघात केला
जिल्हा बँकेत सर्वपक्षीय आघाडी करण्यास ऐनवेळी नकार देऊन महाविकास आघाडीने आमचा विश्वासघात केला, असा आरोप श्री. महाजन यांनी केला. ते म्हणाले, की दोन- तीन बैठकांना कॉंग्रेसवाले सोबत आले. अगदी जागा वाटपावेळी हमरीतुमरी केली आणि जागावाटप झाल्यावर ते म्हणतात जातीयवादी भाजपसोबत आम्ही जाणार नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही हीच स्थिती आहे. सर्व बैठकीला त्यांचे नेते सोबत होते. आमच्या नेत्यावर कारवाई होत असल्याने आम्ही भाजपसोबत जाणार नाही, असे ते म्हणतात. आमच्या बैठका सुरू होत्या, त्यावेळीही राज्यात कारवाया सुरू होत्याच. मग त्यांना त्यावेळी हे सूचले नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही गाफील राहिलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवार कुंटुब राज्यातील सर्व कारखाने खरेदी करतील
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच खानदेश दौरा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट करून त्या माध्यमतून साखर कारखानेही खरेदी करण्याचा त्यांचा डाव असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की चोपडा येथील साखर कारखाना आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. आता आणखी काही साखर कारखाने ते घेत आहेत. पवार कुंटुब राज्यातील सर्व साखर कारखाने खरेदी करू शकतील, असा टोलाही आमदार महाजन यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.